डॉल्फिनचा मुलीवर जीव जडला, प्रेम भंग झाल्यानंतर आत्महत्या, चटका लावणारी प्रेमकहाणी…

तुम्ही कधी समुद्रात राज्य करणाऱ्या डॉल्फिन माशाला एका मुलीवर प्रेम झाल्याचं ऐकलं किंवा पाहिलंय. तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.

डॉल्फिनचा मुलीवर जीव जडला, प्रेम भंग झाल्यानंतर आत्महत्या, चटका लावणारी प्रेमकहाणी...
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 7:40 PM

वॉशिंग्टन : प्राण्यांना जीव लावलं की ते अगदी निस्वार्थवृत्तीने माणसावर प्रेम करतात याची अनेक उदाहरणं आपण ऐकली आणि पाहिली असतील. यात आतापर्यंत पक्षी आणि पाळीव प्राण्यांची अनेक उदाहरणं समोर आलीत. यात पक्षांना आणि प्राण्यांना माणसापासून दूर जाणंही नकोसं होतं. मात्र, तुम्ही कधी समुद्रात राज्य करणाऱ्या डॉल्फिन (Dolphin) माशाला एका मुलीवर प्रेम झाल्याचं ऐकलं किंवा पाहिलंय. तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. इतकंच नाही तर या डॉल्फिनचा या मुलीवर इतका जीव जडला की ही मुलगी त्याला सोडून गेल्यानंतर प्रेमभंगाच्या भावनेतून त्याने थेट आत्महत्या केली. ही गोष्ट कोणत्या चित्रपटाची नाही, तर प्रत्यक्षात घडलेल्या नासाच्या एक संशोधन केंद्रातील आहे. (Dolphin commite suicide after break up with a female researcher Margaret Lovatt in NASA project)

नासाच्या संशोधन केंद्रातील ही गोष्ट जेव्हा जगासमोर आली तेव्हा संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला. 1960 मध्ये नासाच्या एका संशोधन प्रकल्पात महिला संशोधक मार्गारेट लोवात (Margaret Lovatt) डॉल्फिन माशांना इंग्रजी भाषा शिकवण्याचं काम करत होत्या. डॉल्फिनला भाषा शिकवण्यासाठी संशोधक मार्गारेट लोवात यांनी त्यांच्यासोबत 24 तास राहण्याचा निर्णय घेतला आणि याच काळात या नर डॉल्फिनला महिला संशोधकावर प्रेम जडलं.

डॉल्फिनवरील गुप्त प्रकल्प काय होता?

नासाने 1960 मध्ये कॅरेबियाई बेटावर माशांवरील गुप्त प्रकल्प सुरु केला. यात डॉल्फिनच्या वर्तनावर संशोधन करायचं होतं. डॉल्फिन माणसांचं अनुकरण करण्यात हुशार असतात हे लक्षात आलं होतं. म्हणूनच अमेरिकेच्या न्युरोसायंटिस्ट डॉक्टर जॉन लिली यांनी विशेष प्रकारची प्रयोगशाळा तयार केली. या प्रयोगशाळेत दोन मादी डॉल्फिन आणि एक नर डॉल्फिन ठेवण्यात आला. मादी डॉल्फिनची नावं पामेला आणि सिसी अशी होती आणि नर डॉल्फिनचं नाव पीटर होतं. यात पीटर सर्वात तरुण होता. या डॉल्फिनला इंग्रजी भाषा शिकवायची म्हणजे थोडा वेळ देऊन जमणार नव्हता म्हणून संशोधक मार्गारेट यांनी 24 तास त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

संशोधक मार्गारेट यांची खोलीही पाण्यातच

24 तास माशांसोबत रहायचं म्हणजे डॉल्फिनला पाणी आवश्यक होतं. म्हणून प्रयोगशाळेतील मार्गारेट यांच्या संपूर्ण रुममध्ये पाणी सोडण्यात आलं. या पाण्यातच मार्गारेट यांना घोट्यापर्यंत पाणी येईल आणि बसता किंवा आराम करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. डॉल्फिन पीटर सोबत अधिक काळ राहिल्यानंतर तो मार्गारेट यांच्या प्रेमातच पडला. तो मार्गारेट यांच्या पायापाशी येऊन आपली त्वचा त्यांच्या पायाला घासत तासंतास बसत असे.

डॉल्फिनसोबत सेक्सच्याही चर्चा

पीटर डॉल्फिन तरुण असल्याने त्याच्या शरीरातही बदल होत होते. त्यामुळे तो महिला संशोधक मार्गारेट यांना सेक्स पार्टनर म्हणूनही पाहू लागल्याच्याही चर्चा झाल्या. इतकंच नाही तर स्थानिक माध्यमांनी डॉल्फिनसोबत सेक्सचेही दावे केले. हा डॉल्फिन शारीरिक संबंधांच्या उद्देशानेच मार्गारेट यांच्या जवळ येत असल्याचे दावे करण्यात आले. मार्गारेट यांनाही त्याचा अंदाज यायचा आणि त्या त्याला स्पर्श करुन त्याचं समाधान करायच्या. यावर जोरदार टीकाही झाली. मात्र, हे संशोधन सुरुच राहिलं.

प्रेमभंग आणि डॉल्फिनच्या आत्महत्येची बातमी

अखेर काही काळानंतर या प्रयोगशाळेच्या मालकांचा या प्रकल्पातील रस कमी झाला आणि त्यांनी हा प्रकल्प 1966 मध्ये बंद करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे इच्छा नसूनही महिला संशोधक मार्गारेट यांना पीटर डॉल्फिनला सोडून आपल्या घरी जावं लागलं. यानंतर प्रकल्पातील डॉल्फिनला मियामीमध्ये हलवण्यात आलं. मात्र, काही दिवसातच पीटर या डॉल्फिनने आत्महत्या केल्याची बातमी आली. डॉल्फिन देखील माणसाप्रमाणेच श्वास घेतात. त्यामुळे पीटरने प्रेमभंगातून श्वास घेणं बंद केलं आणि आत्महत्या केली असा दावा करण्यात आला.

हेही वाचा :

VIDEO | अथांग समुद्रात उसळी घेणाऱ्या डॉल्फिनसोबत तरुणाचं स्विमिंग; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

गुहागरच्या समुद्रात 200 हून अधिक डॉल्फिन

व्हिडीओ पाहा :

Dolphin commite suicide after break up with a female researcher Margaret Lovatt in NASA project

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.