AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री? डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ल्याच्या योजनेस मंजुरी

iran israel war: डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठकीपूर्वी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना शरण येण्याचा इशारा दिला होता. अन्यथा अमेरिका या हल्ल्यात सहभागी होईल, त्यानंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.

इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री? डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ल्याच्या योजनेस मंजुरी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 19, 2025 | 7:33 AM
Share

iran israel war: इराण आणि इस्त्रायल युद्धाचा व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्लाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. परंतु त्यांनी अंतिम आदेशाची वाट पाहण्यास सांगितले आहे. हल्ला करण्यापूर्वी इराण आपला अणुकार्यक्रम सोडण्यास तयार आहे की नाही हे पाहण्यास ट्रम्प यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी हल्ल्याला या योजनेला मान्यता दिली.

ट्रम्प यांनी काय म्हटले?

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्ट या अहवालात स्ट्रीट जर्नलच्या हवाला देण्यात आला आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या तीन जणांनी या अहवालात याबद्दल सांगितले आहे. रॉयटर्सने म्हटले आहे की, इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या सहभागी होण्याच्या धमकीमुळे तेहरान आपला अणुकार्यक्रम सोडून देईल, अशी अपेक्षा ट्रम्प यांना आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठकीपूर्वी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना शरण येण्याचा इशारा दिला होता. अन्यथा अमेरिका या हल्ल्यात सहभागी होईल, त्यानंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.

खामेनी यांच्याकडून उत्तर

अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेच्या इशारा धुडकवून लावला. त्यांनी म्हटले की, इराण आणि इराणचा लोकांचा इतिहास माहिती असणारे आम्हाला धमकी देऊ शकत नाही. इराण कधी या धमक्यांना घाबरणार नाही. अमेरिकेच्या हल्ल्यालाही जोरदार उत्तर दिले जाईल. अमेरिकेचेही मोठे नुकसान होईल.

अमेरिकेत दोन गट

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यास मान्यता दिली आहे. परंतु ज्या लोकांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी मदत केली आहे, त्यांना अमेरिका मध्य पूर्वेतील या युद्धात ढकलला जावा, असे वाटत नाही. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांना सत्तेत आणणाऱ्या समर्थकांमध्ये फूट पडली आहे. त्यांच्या काही समर्थकांनी त्यांना मध्य पूर्वेतील नवीन युद्धात देशाला अडकवू नये, असे आवाहन केले आहे.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...