AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने चिंता वाढली, हजारो भारतीयांचं भविष्य अंधारात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयांमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अशातच आता ट्रम्प यांनी भारतासह चीनला मोठा दणका दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने चिंता वाढली, हजारो भारतीयांचं भविष्य अंधारात
| Updated on: Jul 25, 2025 | 3:11 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयांमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अशातच आता ट्रम्प यांनी भारतासह चीनला मोठा दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन टेक कंपन्यांमध्ये भारतीयांना नोकरी देण्याच्या विरोधात आहेत. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका एआय परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकन टेक कंपन्यांना भारत आणि चीनमधील लोकांना कामावर घेऊ नका असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता याचा फटका हजारो भारतीयांना बसणार आहे.

ट्रम्प यांचा इशारा

ट्रम्प यांनी एआय परिषदेत बोलताना म्हटले की, ‘काही कंपन्यांनी अमेरिकन लोकांना काढून परदेशी कामगारांना बढती दिली आहे. ही बाब योग्य नाही. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि मेटा यांनी अमेरिकेन लोकांची भरती केली नाही तर सरकार कठोर पावले उचलेल.’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह अनेक कंपन्यांमध्ये भारतीय लोक वरिष्ठ पदांवर आहेत, त्यामुळेच ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.

भारतीय नागरिकांना फटका बसणार

भारतातील हजारो लोक सध्या अमेरिकेत नोकरी करत आहेत. यातील बहुतेक लोक हे आयटी क्षेत्रातील आहेत. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर एच-1 बी व्हिसाद्वारे अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी हजारो भारतीय तरुण अमेरिकेत नोकरीसाठी जातात. मात्र आता ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हजारो भारतीयांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.

भारतातील आयटी क्षेत्राला धक्का बसणार

भारतातील बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या शहरांमध्ये अनेक कंपन्या अमेरिकेवर अवलंबून आहेत. त्यामुळे आता अमेरिकन कंपन्यांनी भारतातील भारतातील भरती थांबवली तर त्याचा नकारात्मक परिणाम भारतातील आयटी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक स्टार्टअप्सला फटका बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकन कंपन्या संकटात

अमेरिकेतील अनेक आयटी कंपन्या भारतीय कामगारांवर अवलंबून आहेत. या कंपन्यांच्या प्रगतीत लाखो भारतीयांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मात्र आता ट्रम्प यांच्या दबावामुळे या कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. या कंपन्या भरती कमी करणार की दुसरा काही निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर कंपन्यांनी ट्रम्प यांचे निर्देश पाळले तर हजारो भारतीयांना त्याचा फटका बसणार आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.