डोनाल्ड ट्रम्प यांनी तणावाच्या परिस्थितीमध्ये थेट फिरवला फोन, रशियाविरोधात मोठा गेम
रशिया युक्रेन युद्ध टोकाला पोहोचले असून अमेरिका मध्यस्थीच्या भूमिकेत काही दिवसांपूर्वी दिसली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. उलट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशियाला धमकावले जात आहे. आता घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळतंय.

रशिया युक्रेन युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून युक्रेनला पाठिंबा देताना दिसत आहेत. दुसरीकडे पुतिन यांच्यासोबतही त्यांचा संवाद सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून संवाद साधला आहे. पुतिन यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला वोलोदिमिर झेलेन्स्की पोहोचले होते. मात्र, अजूनही युक्रेन-रशिया युद्धात मार्ग निघू शकला नाहीये. उलट पुतिन यांनी म्हटले की, एकटा रशिया नाटो देशांसोबत लढत आहे. भारत आणि चीनवर या युद्धादरम्यान अमेरिकेचा दबाव आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के तर चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला. युक्रेनने रशियावर मोठा हल्ला करत रशियाच्या अनेक शहरांना टार्गेट केले.
नुकताच झेलेन्स्की यांनी रशियाने त्यांच्यावर केलेल्या हल्यांची माहिती ट्रम्प यांना दिली. रशियन क्षेपणास्त्र युक्रेनच्या ऊर्जा सुविधांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केल्यानंतर युक्रेनने कीव आणि देशभरातील नऊ प्रदेशांमध्ये आपत्कालीन वीजपुरवठा खंडित केला. रशियाने थेट युक्रेनच्या ऊर्जा सुविधांना टार्गेट केले. या हल्ल्याची माहिती झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिली.
27 सप्टेंबर रोजी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सांगितले की, युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी मॉस्को चर्चेसाठी तयार आहे. दुसरीकडे रशियाने मोठा हल्ला चढवला. युक्रेनने देखील रशियाच्या कच्च्या तेल प्रकल्पांना टार्गेट करत हल्ला केला. ज्यामुळे रशियाच्या तेल प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. आता सध्या रशियाकडून पुन्हा प्रकल्प उभारली जात आहेत. त्यामुळे सध्या त्यांनी अनेक देशांची कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे.
अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर रशिया गेल्या काही दिवसांपासून भारताला मोठी सवलत तेल खरेदीत देत आहे. हेच नाही तर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत भारताने रशियाकडून अधिक तेल खरेदी केली आहे. टॅरिफनंतर रशियाने स्पष्ट म्हटले की, भारताच्या वस्तूंचे स्वागत आम्ही आमच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात करू. यासोबतच भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार देखील केली आहेत.
