AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच

Donald Trump Impeachment : डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 जानेवारीला अध्यक्षपद सोडल्यानंतर महाभियोग प्रस्ताव कसा चालवावा, याविषयी अमेरिकेतील नियमांमध्ये सुस्पष्टता नाही.

Donald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Jan 17, 2021 | 10:20 AM
Share

अमेरिकेत यंदा झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा भारतात सातत्यानं होत आहे. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामुळे अमेरिकेसारख्या जुन्या आणि बलाढ्य लोकशाही देशात सत्तापेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. जगातीस सर्वात ताकदवान देशात येत्या आठवड्यात संत्तातर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागी डेमोक्रॅटिक पक्षाचे विजयी उमेदवार जो बायडन (Joe Biden) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. मात्र, अमेरिकेतील पंरपरेनुसार मावळत्या अध्यक्षांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचं स्वागत करायचं असते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प जो बायडन यांचं स्वागत करतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.(Donald Trump faces second Impeachment power conflict in USA )

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात कॅपिटल बिल्डींगवर ट्रम्प समर्थकांनी केलेला हल्ला, यामुळे अमेरिकेची जगभरात झालेली नाचक्की, निवडणुकीचा निकाल न स्वीकारणं, निकाल बदलण्यासाठी यंत्रणांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न या सर्वांची परिणती अशी झाली की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव आणला गेला. अध्यक्षपदाची कारकीर्द सुरु असताना दोनदा महाभियोग प्रस्तावाला सामोरे जावे लागलेले डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रमप यांची सोशल मीडिया अकाँऊटस रद्द करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोग

अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांचा अधिकृत कार्यकाळ 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे. नव्या अध्यक्षांच्या कार्यकाळाला अवघे काही दिवस राहिले असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्या कारकिर्दीतील दुसरा महाभियोग प्रस्ताव आणला गेला. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डींगवर 6 जानेवारी रोजी केलेला हल्ला ही गोष्ट दुसऱ्या महाभियोगाला कारणीभूत ठरली. 6 जानेवारीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांची रॅली घेतली होती. कॅपिटल बिल्डींगवरील हल्ल्यामुळे जगातील सर्वात बलाढ्य लोकशाहीची जगभर नाचक्की झाली. याघटनेमुळे ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणला गेला. काँग्रेसमध्ये रिपब्लिक पक्षाच्या 10 सदस्यांनी महाभियोग प्रस्तावाला समर्थन दिलं आहे. आता सिनेटमध्ये प्रस्तावावर चर्चा होऊन मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

20 जानेवारीपूर्वी महाभियोग प्रस्ताव प्रक्रिया पूर्ण होणार का?

काँग्रेस म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला असला तरी सिनेटमध्ये मंजूर व्हायचा आहे. अमेरिकेतील परंपरेनुसार 20 जानेवारीला जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधी आणि स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. सिनेट सभागृहाचं कामकाज 19 जानेवारीला सुरु होणार आहे. त्यामुळे महाभियोग प्रस्तावावरील चर्चा आणि मंजुरीची प्रक्रिया त्यापूर्वी होईल का याबद्दल साशंकता आहे.

रिपब्लिक पक्षाच्या सिनेटर मिच मकोनेल यांच्याकडे डेमोक्रेटसच्या सिनेटर्सनी तातडीनं महाभियोग प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, ती मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 जानेवारीला सत्ता सोडल्यानंतर महाभियोगाबाबत कारवाई करावी लागेल. अमेरिकेल प्रचलित पद्धतीनुसार महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश सिनेटर्सचा पाठिंबा गरजेचा असतो. यासाठी रिपब्लिकच्या 17 सिनेटर्सना डेमोक्रॅटसची साथ द्यावी लागेल.

पद सोडल्यानंतर महाभियोग अमेरिकन राज्यघटनेत अस्पष्टता

डोनाल्ड ट्रम्प हे 19 जानेवारीला त्यांच्या पदावरुन पायउतार होतील. 20 जानेवारीला जो बायडन यांचा शपथविधी आणि स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, अध्यक्षांनी पद सोडल्यानंतर त्यांच्यावर महाभियोग कारवाई करण्याबाबत सुस्पष्ट कार्यपद्धती अमेरिकेत नाही. सिनेटमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्यास बायडन प्रशासन पुढील काळात डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या हितासाठी सामान्य बहुमताच्या जोरावर पुढील काळात एखादे पद स्वीकारण्यापासून रोखू शकते. मात्र, त्यापूर्वी रिपब्लिकच्या सिनेटर्सनी महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यासाठी डेमोक्रॅटसला साथ देण्याची गरज आहे.

सिनेटमधील बलाबल

अमेरिकेच्या 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिकचे 50 सदस्य आहेत तर डेमोक्रॅटिकचे 48 सदस्य असून इतर पक्षांचे दोन सदस्य आहेत. ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्ताव सिनेटमध्ये मंजूर होण्यासाठी डेमोक्रॅटिकला रिपब्लिकच्या 17 सिनेटर्सच्या पाठिंब्याची गरज आहे.

पहिला महाभियोग प्रस्ताव

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात पहिला महाभियोग प्रस्ताव 2019 मध्ये आणला गेला होता. सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये  रिपब्लिकचे बहुमत असल्यामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही आणि डोनाल्ड ट्रम्प वाचले होते.

Donald Trump | पडत्या काळात स्वकियांनीही साथ सोडली!, 10 रिपब्लिकन खासदारांकडूनही ट्रम्प विरोधातील महाभियोगाचं समर्थन

परंपरेनुसार डोनाल्ड ट्रम्प जो बायडन यांचं स्वागत करणार का?

अमेरिकेत 1940 च्या दशकापासून नवनिर्वाचित अध्यक्षांचा शपथविधी 20 जानेवारीला होतो. या कार्यक्रमात नव्या अध्यक्षांचं स्वागत केलं जाते. नव्या अध्यक्षांच्या स्वागताला मावळते अध्यक्ष फर्स्ट लेडीसह उपस्थित असतात. मात्र, यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रिया, निकाल यावर वारंवार आक्षेप घेतले होते. सोशल मीडिया अकाऊंटसवरून ते वेगवेगळे दावे करत होते. नव्या अध्यक्षांच्या स्वागताला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहतील का? याबाबत साशंकता कायम आहे.

6 जानेवारीच्या घटनेनं काय समोर आलं?

अमेरिकेची संपूर्ण जगात बलाढय लोकशाही म्हणून ओळख आहे. लोकशाहीचे डोस अमेरिका इतर देशांना सातत्यानं पाजत आलेला आहे. मात्र, 6 जानेवारीला कॅपिटल बिल्डींगवर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेला लोकशाही हा केवळ शब्द नसून ती एक वास्तवात राबवायची प्रक्रिया असल्याचं उमगलं असणार आहे.

संबंधित बातम्या: 

Trump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर

कशी होते अमेरिकेच्या राष्ट्रपतींवर महाभियोगाची कारवाई?; ट्रम्प यांची हकालपट्टी होणार?

Donald Trump faces second Impeachment power conflict in USA

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.