डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देणारी बातमी, अमेरिकेच्या दुश्मनासोबत भारत करतोय थेट करार, कोट्यवधीची गुंतवणूक
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ब्राझीलवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हा टॅरिफ काढण्यासाठी त्यांनी काही अटी लावल्या आहेत. मात्र, भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, काहीही झाले तरीही भारत हा अमेरिकेच्या अटी मान्य करणार नाही. त्यामध्येच आता मोठा धक्का अमेरिकेला भारताने दिला आहे.

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जपानच्या दाैऱ्यावर आहेत. जपानमध्ये त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर जाणे म्हणजे खूप मोठा धक्का अमेरिकेला आहे. मागील काही वर्षात जपान देखील अमेरिकेला वैतागलेला आहे. रिपोर्टनुसार, जपान हा भारतामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. दोन्ही देश मिळून बुलेट ट्रेनची निर्मिती करू शकतात. यासोबतच अजून काही करार होणार आहेत. जपानहून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर आहेत. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून अमेरिकेने स्वत:ची डोकेदुखी वाढवल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल वादग्रस्त विधाने करताना देखील दिसत आहेत.
जपान आणि चीन हे दोन्ही देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानीला वैतागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दाैऱ्यामध्ये जपानची कंपनी सुझुकी मोटर भारतात 68 बिलियन डॉलर गुंतवण्याच्या तयारीत आहे. जपानच्या अनेक कंपन्या या भारतात येण्यास तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास आहे की, जपान भारताच्या राष्ट्रीय हितांना आणि प्राथमिकतांनासोबत घेऊन चालेल.
भारताच्या आर्थिक विकासासाठी जपान हा विश्वासार्ह भागीदार नक्कीच आहे. भारताला मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन सारखे तंत्रज्ञान देणारे जपान भारताला देत आहे शिवाय त्यामध्ये दोन्ही देशांची भागिदारी असणार आहे. भारत आणि जपान रोबोटिक्स, सजहाजबांधणी आणि अणुऊर्जा या क्षेत्रात यशस्वी ऑटो क्षेत्रातील भागीदारीची पुनरावृत्ती करू शकतात. विशेष म्हणजे भारताला कायमच जपानकडून सहकार्य मिळाले आहे.
अमेरिकेने टॅरिफमधून जपानला देखील सोडले नाहीये. जपानवरही मोठी टॅरिफ लावला आहे. जपान देखील अमेरिकेने लावलेल्या टॅरिफला भारताप्रमाणेच गांर्भियाने घेताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर जाऊन तिथे मोठे करार करत अमेरिकेला मोठा संदेश देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. अमेरिकेच्या दादागिरीपुढे अनेक देश एकत्र येताना सध्या दिसत आहेत.
