AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानसोबत भारताची तुलना नकोच, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा, आता अमेरिका…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला सातत्याने वेगवेगळी धमकी ही दिसली जात आहे. हेच नाही तर थेट पाकिस्तानसोबत भारताची तुलना देखील केली जात आहे. आता डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सरकारला मोठे खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

पाकिस्तानसोबत भारताची तुलना नकोच, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा, आता अमेरिका...
Donald Trump
| Updated on: Sep 05, 2025 | 12:27 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाकडून भारताबद्दल आग ओकली जात आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला असून पुढील काळात अजून टॅरिफ लावण्याच्या आणि निर्बंधाच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता थेट ट्रम्प प्रशासनाची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेत इतके संबंध ताणल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर व्यापार चर्चा थांबलीये. हेच नाही तर भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनही टीका होत आहे.

बायडेन प्रशासनाचे माजी अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आणि उपविदेश सचिव कर्ट एम. कॅंपबेल यांनी थेट इशारा देत भारत आणि चीनची वाढती जवळीकता किती जास्त धोकादायक आहे हे सांगितले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, भारताची तुलना पाकिस्तानसोबत केली नाही पाहिजे, कारण अमेरिकेसाठी पाकिस्तानपेक्षा कितीतरी जास्त महत्वाचा भारत आहे.

कॅंपबेल यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेला भारताचे कायमच समर्थन मिळाले आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये खूप चांगले संबंध आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे कायमच त्यांच्या विधानातून साैदेबाजी करतात. त्यांनी पुढे म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील रणनीती एका निर्णयाने व्हायला पाहिजे. पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट भारत हा अमेरिकेसाठी महत्वाचा आहे. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या जवळ जाताना दिसत आहेत. हेच नाही तर भारताला दूर करून ते पाकिस्तानलासोबत घेताना दिसत आहेत.

अमेरिकेच्या भूमीतून भारताला थेट मोठी धमकी देण्यात आली होती. हेच नाही तर पाकिस्तानात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी व्यापार सुरू केल्यानेच डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या बाजूने झुकले आहेत. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात मीच मध्यस्थी केली. मात्र, भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, डोनाल्ड ट्रम्प यांची कोणत्याही प्रकारची मध्यस्थी नाही तर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी मिळून यामधून मार्गे काढला आहे,

Follow Us
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?