AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने टाकला थेट अमेरिकेविरोधात डाव, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुळावर घाव, आता हयगई नाहीच, नवीन पेमेंट..

टॅरिफच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेतील मागील काही वर्षांपासूनचे चांगले संबंध ताणले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला धमकी देताना दिसले. आता भारताने थेट डाव अमेरिकेच्या विरोधात टाकला असून अमेरिकेला पळता भुई कमी केलीये.

भारताने टाकला थेट अमेरिकेविरोधात डाव, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुळावर घाव, आता हयगई नाहीच, नवीन पेमेंट..
Donald Trump
| Updated on: Sep 05, 2025 | 10:53 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठे निर्बंध लादले आहेत. चार दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून भारताला मोठी ऑफर देण्यात आली. रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद करावे, त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ काढण्यास अमेरिका तयार आहे. रशियाकडून तेल खरेदी भारत करत असल्यानेच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. मात्र, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर काही वर्ष संवाद बंद असलेला चीन भारताच्या जवळ आला. हेच नाही तर अमेरिकेच्या विरोधात भारतासोबत चीनही मैदानात उतरला आहे. चीनकडून या काळात काही महत्वाचे करार हे भारतासोबत करण्यात आली आहेत. आता भारत आणि चीन हे दोन देश मिळून अमेरिकेला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

मागील घडलेल्या गोष्टी आणि वाद विसरून अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी भारत आणि चीन एकत्र आली आहेत. एससीओ शिखर परिषदेदरम्यान यावर चर्चा झाली. हेच नाही तर रशिया देखील दोन्ही देशांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देत भारत, चीन आणि रशिया डॉलरऐवजी व्यापारासाठी एक नवीन प्रणाली आणण्याच्या तयारीत आहेत. भारतावर टॅरिफ लावून स्वत:च्याच पायावर मोठा दगड डोनाल्ड ट्रम्प यांनी पाडून घेतला आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक मॅटेओ मॅझिओरी यांनी याबद्दल भाष्य केले आहे. शक्तिशाली देश आता राजकीय प्रभाव पाडण्यासाठी व्यापार आणि वित्तीय प्रणालींचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत. भारत आणि चीनसारखे देश आता पर्यायी पेमेंट सिस्टम तयार करत आहेत. आता दोन्ही देश मिळून अमेरिकेवर दबाव टाकण्याचे काम करत आहेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे दुर्मिळ खनिजांवर चीन नियंत्रण ठेवत आहे.

अमेरिकेने भारताला आपला मित्र म्हणत म्हणत तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला आहे. रशियाचे तेल हे फक्त अमेरिकेचे कारण आहे. जर भारत आणि चीनने डॉलरच्या तुलनेत नवीन पेमेंट सिस्टम सुरू केली तर तो फक्त अमेरिकाच नाही तर जगालाही मोठा धक्का असणार आहे. हेच नाही तर भारत आणि चीनचा हाच प्लॅन असून त्याला रशियाचा देखील पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली असून हा डॉलरसाठी धक्का असून डॉलरच्या किंमत पडण्याचीही शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी