चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे बदलले सूर, तो एक करार आणि..
भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेने मोठी भूमिका घेत चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. मात्र, आता अमेरिकेचा चीनवरील टॅरिफबद्दल भूमिका बदलल्याचे दिसतंय. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेने मोठा निर्णय घेत चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीन देखील मैदानात आला आणि त्यांनी अमेरिकेवर निर्बंध लादण्याचे थेट संकेत दिले. टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला. आता नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत आपल्याला कोणतीही समस्या नसल्याचे स्पष्ट केले. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवरील टॅरिफची अंलवबजावणी होईल. त्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले. विशेष म्हणजे दोन्ही देश सध्या व्यापारावर चर्चा करत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबद्दल हे मोठे विधान केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसोबत करार करायचे आहेत.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनबद्दल बोलताना दिसले. चीनसोबतच्या व्यापारावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, चीनवर 100 टक्के टॅरिफ लावणे शाश्वत नाही. जर दोन्ही बाजूंनी करार झाला नाही तर टॅरिफ लावला जाईल. अमेरिकेचे चीनशी खूप जास्त चांगले संबंध आहेत आणि दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल अशी आशा आहे. ट्रम्प यांनी पुढे स्पष्टपणे म्हटले की, मला आशा आहे की, चीनसोबत सर्वकाही व्यवस्थित होईल.
अमेरिका आणि चीन या आठवड्याच्या शेवटी चर्चा करतील. जर यादरम्यान अमेरिकेला हवे आहेत ते व्यापार करार झाले नाही तर चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला जाईल. जर अमेरिकेला पाहिजे असलेले करार चीनने केले तर त्यांच्यावरील टॅरिफचे संकट टळेल आणि असे स्पष्ट संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफचा वार दोन देशांमध्ये मर्यादित राहिलेला नाही. याचा परिणाम इतर देश आणि कंपन्यांवर होतोय.
अजून प्रत्यक्षात अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावला नाहीये. या टॅरिफमुळे चीनमधून आयात होणारे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्स यांसारखे उत्पादने महाग होतील. अमेरिकेने अगोदर स्पष्ट केले की, चीनने दुर्मिळ खनिजांवर घातलेल्या निर्बंधांमुळे आम्ही त्यांच्यावर टॅरिफ लावतोय. जर अमेरिका आणि चीनमध्ये करार झाले तर अमेरिका चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावणार नाही. भारतावर टॅरिफ लावताना भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा देश आहे
