डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्कादायक विधान, भारताच्या टॅरिफवरून म्हणाले, तो त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्काच, पण…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंध हे ताणले गेल्याचे बघायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर लावलेल्या टॅरिफबद्दल थेट विधान करताना दिसत आहेत. आता त्यांनी रशियाबद्दलही विधान केलंय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्या विरोधात गरळ ओकताना दिसत आहेत. ट्रम्पची सर्वात मोठी पोटदुखी म्हणजे भारत रशियाकडून कच्चे तेल स्वस्तामध्ये खरेदी करत आहे. ट्रम्पने भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. टॅरिफवरून अमेरिका सतत भारतावर दबाव पाडत आहे. यावर भारताने देखील थेट भाष्य करत अमेरिकेच्या या निर्णयाचा विरोध केलाय. अमेरिकेची टॅरिफबद्दलची दुटप्पी भूमिका जगासमोर आलीये. भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षांपासून व्यापार करत असलेल्या अमेरिकन कंपन्यांवर भारत कारवाई करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे आणि जर भारताकडून असे करण्यात आले तर थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केलंय. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्कामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी होणाऱ्या बैठकीपूर्वी त्यांनी हे विधान केलंय. परत एकदा भारतावर बोलताना ट्रम्पने म्हटले की, भारताला रशियाचा सर्वात मोठा किंवा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार म्हटले जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रशियाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार भारत आहे. तुम्ही जर रशियाकडून तेल खरेदी केले तर आम्ही तुमच्यावर 50 टक्के टॅरिफ लागू करू आणि हा रशियासाठी मोठा झटकाच म्हणावा लागणार आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये याबद्दल बोलताना ट्रम्प दिसले. मुळात म्हणजे रशियाची अर्थव्यवस्था जे काही करत आहे ते अजिबातच बरोबर नसल्याचेही त्यांनी म्हटले.
मुळात म्हणजे रशियाने स्वत:चा देश बांधायला परत एकदा नव्याने सुरूवात करावी. रशियामध्ये हे सर्व करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले. पुढच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. या भेटीत नेमके काय घडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल थेट बोलताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचे थेट कारणही सांगून टाकले आहे.
