डोनाल्ड ट्रम्प यांची कानउघडणी, थेट सुनावले खडेबोल, चीनचा सामना करण्यासाठी भारतच….
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. आता थेट त्यांना अमेरिकेतूनच घेरण्याचे काम सुरू झाले असून भारतासोबतचे चांगले संबंध खराब करू नये, असे थेट सांगितले जात आहे.

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. सातत्याने भारतावर टॅरिफसाठी दबाव टाकला जात आहे. हेच नाही तर अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्याचे कारणही पुढे आले. संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हेली यांनी थेट मोठी चेतावणी देऊन टाकली आहे. त्यांनी वॉशिंग्टन आणि दिल्लीच्या संबंधांवर भाष्य करत म्हटले की, हे संबंध आता तुटण्याच्या मार्गावर आहेत. चीनच्या वाढत्या प्रभाव बघता वॉशिंग्टन आणि दिल्लीतील संबंध संपतील. यासोबतच्य त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांची कानउघडणी करत म्हटले की, भारताला आपल्या शत्रूसारखे वागवणे बंद करावे.
अमेरिकेने लवकरात लवकर भारतासोबतचे संबंध सुधारली पाहिजेत. न्यूजवीकमधील लेखामध्ये त्यांनी भारत आणि अमेरिकेतील टॅरिफ वादावर थेट भाष्य केले. रशियाचे तेल आणि टॅरिफ वाद भारत आणि अमेरिकेतील संबंध खराब करत आहे. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेचा भारत हा चांगला मित्र आहे. मला स्पष्ट वाटते की, वाॉशिंग्टनने दिल्लीला हातून जाऊ दिले नाही पाहिजे. यासोबतच त्यांनी म्हटले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाला युद्धासाठी मोठा पैसा मिळत आहे.
वॉशिंग्टनसाठी भारत कोणत्या मित्रापेक्षा पुढे नाही, हे डोनाल्ड ट्रम्प सरकारला समजले पाहिजे. मुळात म्हणजे भारतात ती क्षमता आहे की, चीनच्या समान कपडा, फोन आणि सोलर पॅनल निर्माण करण्याची. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भारताचा विकास होणार आहे तशी चीनकडून महत्वकांक्षा कमीच आहे. हेच नाही तर भारत आणि अमेरिकेतील सध्याच्या संबंधांचा फायदा हा चीनकडून घेतला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांमध्ये दरार निर्माण केली जात आहे. चीनसोबत सामना करण्यासाठी अमेरिकेला भारतासारख्या मित्राची अत्यंत गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक बैठक होण्याची गरज असल्याचेही हेली यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला धमकावले जात आहे. यादरम्यान चीन आणि भारतामधील जवळीकता वाढल्याचे बघायला मिळत आहे.
