डोनाल्ड ट्रम्प यांची हुकुमशाही सुरूच, ‘या’ देशाचे राष्ट्रपती झुकणार? थेट मोठी अट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक पार पडलीये. मात्र, या बैठकीनंतर मोठ्या घडामोडींना वेग आलाय. पुतिन यांच्यासोबतच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भुमिका बदलेले अशी अपेक्षा भारताला होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नसून परत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या भेटीनंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी स्वत:हून फोन करत त्यांच्यासोबत संवाद साधला आणि पुतिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीबद्दल माहिती दिली. फक्त माहितीच नाही तर त्यांनी उद्या 18 ऑगस्ट 2025 ला अमेरिकेला येण्यास सांगितले. आता वोलोदिमीर जेलेंस्की उद्या अमेरिकेला जाणार असल्याची माहिती आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाबद्दल यांच्यात चर्चा आहे. रशियाने युद्ध बंद करण्यासाठी काही अटी घातल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
वोलोदिमीर जेलेंस्की हे यापूर्वी ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीला पोहोचले होते. त्यावेळी ते बैठक अर्धवट सोडून निघून गेले होते आणि त्यांच्यासाठी तो अनुभव अत्यंत वाईट होता. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, रशियासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वोलोदिमीर जेलेंस्कीवर दबाव टाकला जाईल. हे युद्ध संपवण्यासाठी त्यांना रशियाच्या अटी मान्य कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट सांगितले जाणार आहे.
शांतीचा करार करण्यासाठी युक्रेनला आपला काही भाग हा रशियाला द्यावा लागणार आहे, यासाठी अमेरिकेकडून युक्रेनवर दबाव टाकला जाईल. यासाठीच वोलोदिमीर जेलेंस्की यांना अमेरिकेत बोलवण्यात आलंय. वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यात डोनाल्ड ट्रम्प चर्चा करतील. आता उद्याच्या या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. युक्रेन डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेल्या अटी मान्य करेल का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये स्पष्ट केले की, जर हे युद्ध थांबवायचे असेल तर युक्रेनला त्यांची डोनबास रशियाच्या ताब्यात द्यावे लागेल. डोनबासवर रशिया नियंत्रण मिळू शकत नाहीये. आता हे युद्ध या करारावर थांबते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्यावरून भारताबद्दल सतत वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत. त्यांनी आतापर्यंत भारताला धमक्या दिल्या आहेत. मात्र, भारताचा टॅरिफच्या मुद्यावरून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने अजूनही अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली नाहीये. पुढील काही दिवसांमध्ये घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
