डोनाल्ड ट्रम्प यांचा फाटला बुरखा, एकीकडे भारतावर टॅरिफ तर दुसरीकडे रशियासोबत मोठा करार करण्याची तयारी
डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतील हे सांगणे कठीण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावून धक्का दिलाय. हेच नाही तर मधल्या काळात ते भारताला सातत्याने धमक्या देताना देखील दिसले. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा जमासमोर आलाय.

अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा आरोप करत सांगण्यात आले की, युक्रेन आणि रशियातील युद्ध हे भारतामुळेच सुरू आहे. भारत मोठ्या प्रमाणात तेल रशियाकडून खरेदी करत असल्याने रशियाला युक्रेनच्या विरोधात युद्धासाठी तो पैसा वापरत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. हेच नाही तर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, भारत हा अमेरिकेच्या धमकी पुढे झुकला नसल्याने भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ हे अमेरिकेकडून लावण्यात आले. भारताने अमेरिकेच्या धमकीनंतरही काही मोठे करार रशियासोबत केली.
भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा रशियाने करताच पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन देखील केला. आता अमेरिकेची मोठी पोलखोल करण्यात आली. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ लावणारे डोनाल्ड ट्रम्प हे चक्क रशियासोबत मोठा करार करण्यास निघाले आहेत. एनर्जी करार अमेरिकेला रशियासोबत करायचा आहे. नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये याबद्दल खुलासा हा करण्यात आलाय.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने युक्रेनला शांतीसाठी राजी केल्यानंतर अमेरिकेने त्याच्या बदल्यात रशिया पुढे एनर्जीचा एक मोठा करार ठेवला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने काही निर्बंध त्यांच्यावर लादली होती. आता तेच डोनाल्ड ट्रम्प हे रशियासोबत करार करत आहेत. मात्र, अजून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाबाबत तोडगा निघू शकला नाहीये. युद्धावर तोडगा निघालेला नसतानाच अमेरिका डाळ शिकवण्यास निघालीये.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन कंपन्या या रशियातील महत्वाच्या प्रकल्पांमध्ये प्रवेश करू इच्छितात. अमेरिका रशियाचे परमाणू ऊर्जावरून चालणारे जहाज देखील खरेदी करण्याच्या तयारी आहे. भारतावर रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्ब 50 टक्के टॅरिफ लावले आणि दुसरीकडे मात्र स्वत: डोनाल्ड ट्रम्प हे जवळीकता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आपण भारताच्यासोबत असल्याची भूमिका रशियाकडून जाहीर करण्यात आली. त्यामध्येच आता रशिया अमेरिकेसोबत करार करणार का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.
