AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lebanon Electricity Blackouts: इंधन संपलं, अख्खा देश ब्लॅकआऊट, लेबनानमध्ये वीज प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी पैसाच नाही!

देशातील दोन मोठे वीजनिर्मिती केंद्र इंधन कमतरतेमुळे बंद झाले आहेत. शनिवारी संपूर्ण ब्लॅकआऊट होण्यापूर्वीच लोकांना दिवसाला फक्त काही तास वीज मिळत होती.

Lebanon Electricity Blackouts: इंधन संपलं, अख्खा देश ब्लॅकआऊट, लेबनानमध्ये वीज प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी पैसाच नाही!
अख्ख्या लेबनानमध्ये शनिवारी वीजपुरवठा खंडित झाला होता.
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 10:50 AM
Share

लेबनानमध्ये रविवारी वीज पुरवठा सुरळीत झाला. शनिवारी दुपारपासून अख्खा देश अंधारात बुडाला होता. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत लष्कराने सरकारला त्याच्या साठ्यातून इंधन दिलं, त्यानंतर पॉवर ग्रीड सुरू करण्यात आलं. सध्या ही समस्या केवळ तात्पुरती सोडवली गेली आहे. (Electricity Restored in Lebanon) आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशाच्या सरकारला लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय शोधावा लागणार आहे. देशातील दोन मोठे वीजनिर्मिती केंद्र इंधन कमतरतेमुळे बंद झाले आहेत. शनिवारी संपूर्ण ब्लॅकआऊट होण्यापूर्वीच लोकांना दिवसाला फक्त काही तास वीज मिळत होती. (Electricity is restored in lebanon power grid back online on sunday after army supplies fuel)

देशाचे ऊर्जा मंत्री वालिद फय्याद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, लष्कराने त्याच्या साठ्यातून वीज प्रकल्पांना इंधन पुरवले आहे. त्यानंतर हरन अम्मर आणि जहरानी पॉवर स्टेशनमध्ये काम सुरू झाले आहे. त्यामुळे देशाला आता दिवसांतून काही तास वीज पुरवठा होऊ शकतो. लष्कराने पुरवलेलं इंधन फक्त काही दिवस चालणार आहे. त्यामुळेच लवकरात लवकर सरकारला काहीतरी उपाययोजना करावी लागणार आहे. नाहीतर अख्खा देश पुन्हा अंधारात जाणार आहे. (Lebanon Electricity Cut Off)

सेंट्रल बँकेकडून आर्थिक मदत

ऊर्जा मंत्री फय्याद म्हणाले की, लेबनानच्या मध्यवर्ती बँकेने इंधन आयात करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सची परवानगी दिली आहे, ज्यामुळे महिन्याच्या अखेरीपर्यंत वीज उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यांनी संरक्षण मंत्री, लष्करी कमांडर आणि सरकारी वीज कंपनीचे तातडीने वीज सुरु केल्याबद्दल आभार मानले. 60 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील बहुतांश लोक आधीपासूनच जनरेटरवर अवलंबून आहेत. (What Causes Electricity Blackouts) हा देश 150 वर्षांच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे, त्यामुळे इंधनाची समस्या आधीच कायम आहे. पण एक दिवसापूर्वी झालेला ब्लॅकआउट हे आतापर्यंतचे सर्वात मोठे वीज संकट होतं.

इंधन आयात करताना समस्या

लेबनान सरकारला इंधन आयात करण्यात अडचणी येत आहेत. (Beirut Lebanon Electricity) कारण दोन वर्षांत देशाचे चलन 90 टक्क्यांनी घसरलं आहे. अनेक मालाच्या किंमती तीन ते चार पटींनी वाढल्या आहेत. यामुळेच लोकांना वाहनांमध्ये इंधन घेण्यासाठी अनेक मैल लांब रांगेत उभे राहावे लागते. अनेक वेळा या दरम्यान हिंसाचारही झाला आहे. बहुतेक लोक विजेसाठी खाजगी जनरेटर वापरतात. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे की, देशातील 78 टक्के लोकसंख्या गरीबीमध्ये जगत आहे.

हेही वाचा:

मॉल, किराणा शॉप्स रिकामे, कुणाला पेट्रोल, कुणाला किराणा मिळेना, ब्रिटनमध्ये सैनिक ट्रक चालवण्याच्या तयारीत

पाकच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर खान यांचं निधन; एका रात्रीत ठरलेले हिरो

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.