AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, एलॉन मस्कने पुरवली भारताला ताकद, काय घडलं?

एलॉन मस्क यांनी लागू केलेल्या टॅरिफचा वाद थांबायचं नाव घेत नाहीये. आता ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याला अब्जाधीश एलॉन मस्क यांनी चांगलेच सुनावले आहे. ट्विटरवर हे युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, एलॉन मस्कने पुरवली भारताला ताकद, काय घडलं?
elon musk and peter navarro
| Updated on: Sep 08, 2025 | 3:38 PM
Share

Donald Trump Tariffs : भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे सध्या या दोन्ही देशांत व्यापारविषयक संबंध खराब झालेले आहेत. ट्रम्प यांनी लादलेल्या याच टॅरिफमुळे अमेरिकेत सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. तिथल्या काही नागरिकांनी ट्रम्प यांच्या नीतीला समर्थन दिले आहे. तर काही लोकांनी ट्रम्प यांचा उघड विरोध केला आहे. आता याच टॅरिफ वादात अब्जाधीश एलॉन मस्क यांनीही थेट उडी घेतली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफचे समर्थन करणाऱ्या पीटर नवारो यांना मस्क यांनी चांगलंच सुनावलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या साथीदाराचा दावा खोटा?

पीटर नवारो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी तसेच व्यवसायविषयक सल्लागार आहेत. एलॉन मस्क आता याच पीटर यांना थेट भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी नवारो यांनी भारताविषयी गरळ ओकणारे ट्वीट केले होते. त्यांचे हे ट्विट किती तथ्यहीन आहे, याची माहिती ट्विटरने कम्यूनिटी नोट्सच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर मस्क यांनी आपल्या मालकीच्या एक्स या समाजमाध्यमावरील माहिती खरी असल्याचा दावा करताना नवारो यांच्यावर टीका केली आहे.

पीटर नवारो यांनी नेमकं काय ट्वीट केलं होतं?

पीटर नवारो गेल्या अनेक दिवसांपासून भारतावर टीका कर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाला त्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करतो. हाच पैसा रशिया युक्रेनविरोधातील युद्धात वापरतो, असा दावा नवारो यांनी केला होता. एक्सच्या कम्युनिटी नोटने नवारो यांच्या या पोस्टमधील दावे फॅक्ट चेकच्या माध्यमातून चुकीचे असल्याचे सांगितले. उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. भारताचा हा व्यापार फक्त नफ्याला समोर ठेवून नाही. भारत हा व्यापार करत असताना कोणत्याही अंतरराष्ट्रीय बंधनांचे उल्लंघन करत नाही, असे एक्सच्या कम्युनिटी नोटने सांगितले. तसेच अमेरिकादेखील रशियाकडून युरेनियम आणि अन्य खनिजांची खऱेदी करतो. अमेरिकेची ही दुतोंडी भूमिका आहे, असे एक्सच्या कम्युनिटी नोटने म्हटले.

एलॉन मस्क यांनी नवारो यांना चांगलंच सुनावलं

एक्स्या याच फॅक्ट चेकमुळे नवारो चांगलेच भडकले. त्यांनी एक्सच्या कम्युनिटी नोटला कचरा म्हणत हिणवले. तसेच एलॉन मस्क हे विदेशी प्रचार करत आहेत, असा दावा केला. त्यांचा हाच दावा फेटाळून लावत एलॉन मस्क यांनीदेखील नवारो यांना चांगलेच सुनावले. एक्स हा प्लॅटपॉर्म रियल टाईम, पारदर्शी, फॅक्ट चेक स्त्रोत आहे. आजकाल लोक कोणती गोष्ट नरेटिव्ह आहे हे स्वत:च ओळखतात. एक्स या मंचावर प्रत्येक पक्षाची बाजू समोर येते, असे म्हणत नवारो यांना सुनावलं.

दरम्यान, भारतावर लागू केलेल्या टॅरिफविषयी अमेरिकेतच मत-मतांतरं असल्याने आता पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.