AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk Vs Donald Trump : ट्रम्पशी पंगा मस्कला पडला भारी, एका दिवसात इतकं नुकसान जितकं पाकिस्तानच बजेटही नाही

Elon Musk Vs Donald Trump : एलम मस्कने यावर्षी जितकी संपत्ती गमावली आहे, तो आकडा World's Top Billionaires List मध्ये सहभागी असलेल्या अनेक दिग्गज अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीपेक्षा पण जास्त आहे. यात भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani- 82.5 अब्ज डॉलर), दीर्घकाळ टॉप-10 लिस्ट मध्ये राहिलेले कार्लोस स्लिम हेलू (93.8 अब्ज डॉलर) आहेत.

Elon Musk Vs Donald Trump : ट्रम्पशी पंगा मस्कला पडला भारी, एका दिवसात इतकं नुकसान जितकं पाकिस्तानच बजेटही नाही
डोनाल्ड ट्रम्प, एलन मस्क
| Updated on: Jun 06, 2025 | 10:20 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला प्रमुख एलन मस्क यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर दिसू लागलाय. मस्कने ट्रम्प यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. याचा परिणाम टेस्लाच्या शेअर्सवर झाला. टेस्लाचे शेअर्स कोसळले. त्यामुळे मस्क यांना प्रचंड नुकसान झालं. मागच्या 24 तासात मस्क यांच्या संपत्तीत 3 लाख कोटीने घट झाली आहे. हा आकडा पाकिस्तानच्या FY2025-26 साठी मंजूर झालेल्या एकूण बजेटपेक्षाही जास्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेतल्यानंतर टेस्लाचा शेअर गुरुवारी 9.53 टक्क्यांनी घसरला. ही घसरण दिवसाच्या व्यवहारात 14 टक्क्यांपर्यंत गेली होती. याचा परिणाम एलन मस्क यांच्या नेटवर्थवर दिसून आला. ब्लूमबर्गच्या रियल टाइम बिलेनियर्स इंडेक्सनुसार, Elon Musk Net Worth कमी होऊन 335 अब्ज डॉलर झालीय. मागच्या 24 तासात मस्कची 33.9 अब्ज डॉलर (जवळपा, 2.93 लाख कोटी रुपये) संपत्ती स्वाहा झाली.

एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील या वादामुळे टेस्लाच्या गुंतवणूकदारांमध्ये भितीच वातावरण आहे. कंपनीच मार्केट कॅपिटलायजेशन अब्जो डॉलर्सनी घटलय. फक्त टेस्लाच नाही, मस्क यांच्या अन्य बिझनेसेसवरही याचा परिणाम दिसून आलाय. इलेक्ट्रिक कार उत्पादनासह मस्कची स्पेसएक्स (SpaceX) न्यूरालिंक (Neuralink) आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही (पहले Twitter) परिणाम होण्याची शक्यता विश्लेषक वर्तवत आहेत.

पाकिस्तानच बजेट काय?

एलन मस्क यांचं एकादिवसात झालेलं नुकसान हे पाकिस्तानात सादर होणाऱ्या अनुमानित बजेटपेक्षा जवळपास दुप्पट आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेने (NEC) आगामी वित्त वर्ष 2025-26 साठी 4,224 अब्ज पाकिस्तानी रुपये राष्ट्रीय विकास बजेटला सर्वसम्मती मंजुरी दिली आहे. मस्कच एकादिवसाच नुकसान पाकिस्तानी करन्सीमध्ये कन्वर्ट केल्यास जवळपास 9500 अब्ज PKR होतं.

अजून श्रीमंतांच्या यादीत मस्क टॉपवर

जगातल्या टॉप-10 अब्जाधीशांमध्ये नंबर एकवर एलन मस्क यांचा दबदबा कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर 241 अब्ज डॉलरसह Mark Zuckerberg, तिसऱ्या स्थानावर 229 अब्ज डॉलरसह Jeff Bezos, चौथ्यावर लॅरी एलिसन (193 अब्ज डॉलर), पाचव्यावर बिल गेट्स (176 अब्ज डॉलर) आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.