भयानक…! वय वर्षे 68, आणि 100 च्या वर महिलांवर बलात्कार, मृतदेहांनाही सोडले नाही…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Nov 03, 2022 | 9:15 PM

इंग्लंडमधील 68 वर्षाच्या डेव्हिडने 101 महिलांवर बलात्कार आणि 23 मृतदेहांवर अत्याचार केले आहेत.

भयानक...! वय वर्षे 68, आणि 100 च्या वर महिलांवर बलात्कार, मृतदेहांनाही सोडले नाही...

नवी दिल्लीः दुहेरी हत्याकांडात शिक्षा झालेल्या एका आरोपीवर अनेक महिलांच्या मृतदेहांसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. हे प्रकरण इंग्लंडमधील केंट भागातील टुनब्रिज वेल्समध्ये घडले आहे. तिथे डेव्हिड फुलर नावाच्या गुन्हेगाराने दोन महिलांना मरेपर्यंत मारहाण केली होती. आता त्याच आरोपींवर 23 महिलांच्या मृतदेहांसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. दोषी डेव्हिड फुलर नावाच्या या आरोपीने 13 वर्षांत 23 वेगवेगळ्या महिलांच्या मृतदेहांवर अत्याचार केला आहे.

न्यायालयाने याबाबत सुनावणी झाल्यानंतर डेव्हिडनेही आपला गुन्हा मान्य केला आहे. 68 वर्षीय डेव्हिडला न्यायालयात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्याने केलेले सर्व गुन्हे कबूल केले आहेत.

त्याने 12 वेळा मृत महिलांवर बलात्कार केल्याचे सांगितले. ही सर्व प्रकरणं 2007 ते 2020 या काळात घडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

डेव्हिडला डिसेंबर 2021 मध्येही दोन महिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर 1987 मध्ये, डेव्हिडने वँडी नेल आणि कॅरोलिन पियर्स या दोन महिलांवर लैंगिक अत्याचार करुन, त्यानंतर त्या दोघींची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्याच्या या गुन्हेगारी वृत्तीचा माहिती समजताच अनेकांना धक्का बसला आहे.

या प्रकरणाचा तपास करताना असे आढळून आले आहे की, 2008 ते 2020 या कालावधीत डेव्हिडने 78 महिलांच्या मृतदेहांवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

त्याप्रकरणी त्याला दोषीही ठरवण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI