‘जा मुलं जन्माला घाला, आम्ही आठवडाभराची सुट्टी देऊ’, सरकारची ऑफर
सरकारने अशी विचित्र ऑफर दिली आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रशियन सरकार लवकरच नियम आणणार आहे की, लोकांना केवळ कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी एक आठवड्याची रजा दिली जाईल.

जगात वेगवेगळे देश आहेत आणि प्रत्येकाच्या आपापल्या समस्या आहेत. कुठे खाण्या-पिण्याचा तुटवडा आहे, तर कुठे पैसे नाहीत. तथापि, काही देश असे आहेत जिथे लोकसंख्या वाढीचा अभाव ही स्वतःच एक समस्या आहे. भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोक त्रस्त आहेत, पण रशियात लोकसंख्या वाढत नाही, ही सरकारची डोकेदुखी आहे. त्यासाठी ते जनतेला विचित्र ऑफर्स देत असतात. असाच आणखी एक नियम सध्या चर्चेत आहे.
कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी एक आठवड्याची रजा
सरकारने अशी विचित्र ऑफर दिली आहे, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रशियन सरकार लवकरच नियम आणणार आहे की, लोकांना केवळ कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी एक आठवड्याची रजा दिली जाईल. त्यावर संसदेत चर्चा झाली आहे. क्रेमलिन समर्थक खासदार जॉर्जी अरापोव यांनी संबंधित प्रस्ताव मांडला.
एक आठवडा सुट्टी घ्या
रशियातील घटता जन्मदर वाढवण्यासाठी क्रेमलिनने अनोखे पाऊल उचलले आहे. क्रेमलिन समर्थक खासदार जॉर्जी अरापोव यांनी जोडप्यांना मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्षातून एक आठवडा सुट्टी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 25 वर्षीय आरापोव देशातील सर्वात तरुण खासदार आहेत. अशा सुट्टीमुळे लोकांना कुटुंब सुरू करण्याची किंवा तणावाशिवाय नातेसंबंध निर्माण करण्याची संधी मिळेल, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.
रशियात लोकसंख्या ‘ही’ समस्या
कसंही केलं तरी मुलांना जन्म द्या
याव्यतिरिक्त, डॉ. येवगेनी शेस्टोलोव्ह यांनी सुचवले की कर्मचारी त्यांच्या कॉफी किंवा दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीमधून वेळ काढून बाळासाठी योजना आखू शकतात. रशियात यासंबंधी यापूर्वी अनेक विचित्र प्रस्ताव आले आहेत – जसे की रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत इंटरनेट आणि वीज बंद ठेवणे, जेणेकरून लोक दर्जेदार वेळ घालवू शकतील. याशिवाय काही भागात पहिल्या तारखेसाठी 4500 रुपये, गरोदर मुलींसाठी 1 लाख 5 हजार 22 रुपये आणि पहिल्या अपत्यासाठी 9 लाख 70 हजार 319 रुपयांपर्यंत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
रशियाची लोकसंख्या वाढविणे ही राष्ट्रीय प्राथमिकता असल्याचे रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. आपण किती असू, यावर रशियाचे भवितव्य अवलंबून आहे, असे ते म्हणाले. देशातील आघाडीच्या राजकारण्यांपैकी एक असलेल्या अॅना कुझनेत्सोवा यांनी महिलांना वयाच्या 19-20 व्या वर्षापासून मुले होण्यास सुरुवात करावी, गरोदरपणाचे किमान वय नसते, असे सुचवले आहे.
