37 हत्या करणाऱ्या ‘जोडिएक किलर’चा कोडेड मेसेज तब्बल 50 वर्षांनी डिकोड, वाचून अधिकारी अवाक

कॅलिफोर्नियामधील (California) एका ‘जोडिएक किलर’चा (Zodiac Killer) कोड स्वरुपातील मेसेज तब्बल 50 वर्षांनी डिकोड करण्यात यश आलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:47 PM, 12 Dec 2020
37 हत्या करणाऱ्या ‘जोडिएक किलर’चा कोडेड मेसेज तब्बल 50 वर्षांनी डिकोड, वाचून अधिकारी अवाक

सॅक्रामेंटो : कॅलिफोर्नियामधील (California) एका ‘जोडिएक किलर’चा (Zodiac Killer) कोड स्वरुपातील मेसेज तब्बल 50 वर्षांनी डिकोड करण्यात यश आलं आहे. संबंधित गुन्हेगाराने हत्या केल्यानंतर सॅन फ्रांसिस्को क्रॉनिकलच्या एका वर्तमान पत्राला हा कोडेड मेसेज पाठवला होता. आता 50 वर्षांनंतर क्रिप्टोग्राफी अँथोसिएस्टस यांनी संबंधित कोडेड मेसेज डिकोड केल्याचा दावा केला आहे.

संबंधित जोडिएक किलरने 1960 च्या दशकात उत्तर कॅलिफोर्नियात मोठी दहशत माजवली होती. त्याने नोव्हेंबर 1969 मध्ये सॅन फ्रांसिस्कोच्या क्रॉनिकल वर्तमानपत्राला एक कोडेड मेसेज पाठवला होता. यात त्याने सांकेतिक अक्षरं आणि प्रतिकांमध्ये लिहिलं होतं.

हा मेसेज डिकोड झाल्यानंतर संबंधित गुन्हेगाराचीही ओळख पटेल, अशी आशा तज्ज्ञांना आहे. या गुन्हेगाराने 1968 आणि 1969 मध्ये 5 हत्या केल्याचं उघड झालं होतं. मात्र, प्रत्यक्षात त्याने एकूण 37 हत्या केल्याचाही दावा केला जातो. या हत्याकांडात इतर सीरियल किलरचाही समावेश होता.

कोडेड मेसेजमध्ये काय लिहिलंय?

या सिरिअल किलरने आपल्या कोडेड मेसेजमध्ये लिहिलं आहे, “मला माहिती आहे की तुम्हा सर्वांना मला शोधण्यात खूप मजा येत आहे. मला गॅस चेंबरची भीती वाटत नाही. माझ्याकडे काम करण्यासाठी खूप गुलाम आहेत.”

अमेरिकेचे एक 46 वर्षीय वेब डिझायनर डेविड ऑरंचक यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं होतं की ते 2006 पासून हा मेसेज डिकोड करण्यासाठी प्रयत्न करत होते. हा मेसेज डिकोड करण्यासाठी खूप वर्ष आणि अनेक कम्प्यूटर प्रोग्राम लागले.

असं असलं तरी 1969 मध्ये कॅलिफोर्नियातील एका शिक्षक दाम्पत्याने हा मेसेज डिकोड केल्याचा दावा केला होता. त्यांच्या माहितीनुसार या मेसेज म्हटलं होतं की, “मला हत्या करण्यात खूप आनंद वाटतो. हे खूप मजेशीर काम आहे. माझे गुलाम माझी हत्या करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांना माझ्यासमोर धरुन आणतात.”

डेविड ऑरंचक यांच्या अहवालात म्हटलं आहे, “या कोडेड मेसेजमध्ये काय लिहिलं आहे हे क्रिप्टो कम्युनिटीच्या लोकांना माहिती होतं. या कोडेड मेसेजमध्ये जे चिन्हं आहेत त्याचा काय अर्थ होऊ शकतो हे आम्हाला माहिती होतं. या मेसेजमध्ये 340 सिफर अक्षरांना तिरकं करुन वाचता येत होतं. या मेसेजची सुरुवात वरच्या बाजूने डावीकडून होते.”

हेही वाचा :

जगातील 5 माथेफिरु सीरिअरल किलर, एकावर 200 हत्यांचा आरोप

Experts decode coded message sent by Zodiac killer after 50 years