AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडीलांनी २८ वर्षांनी लहान असलेल्या मोलकरणीशी लग्न केले, ४६० कोटींची संपत्ती केली नावावर, आई- मुलात वाद

जेव्हा संपत्तीचा प्रश्न असतो तेव्हा सर्व नाती एकमेकांच्या जीवावर उठतात. असाच एक खटला कोर्टात सुरु आहे. या ठिकाणी अब्जाधीशाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलांमध्ये वारसा संपत्तीवरुन वाद सुरु झाला. यात दुसऱ्या पत्नीचा अखेर विजय झाला आहे. परंतू या प्रकरणाची पार्श्वभूमी मोठी रंजक आहे.

वडीलांनी २८ वर्षांनी लहान असलेल्या मोलकरणीशी लग्न केले, ४६० कोटींची संपत्ती केली नावावर, आई- मुलात वाद
| Updated on: Oct 31, 2025 | 9:39 PM
Share

ब्रिटनमध्ये एक कौटुंबिक वाद सर्वाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. यात एका मोलकरणीने आपल्या दीवंगत पतीच्या ४३ मिलियन पाऊंड ( सुमारे ४६० कोटी रुपये ) ची संपत्तीच्या अधिकाराचा लढा आपल्याच सावत्र मुलाशी लढून जिंकला आहे. हे प्रकरण प्रसिद्ध रिचर्ड स्कॉट कुटुंबियांचे आहे. त्यांना कार बूट किंग म्हणून ओळखले जात होते. रिचर्ड स्कॉट यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर २०१६ मध्ये त्यांची क्लीनर जेनिफर हीच्याशी विवाह केला होता. जेनिफर त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान होती. लग्नानंतर रिचर्ट स्कॉट यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला संपत्तीतून बेदखल केले होते.

२०१८ साली झाला मृत्यू

रिचर्ड यांचा २०१८ साली ८१ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर जेनिफर हिला संपूर्ण संपत्ती आणि फार्मचे उत्तराधिकारी घोषीत केले. याची किंमत ४३ दशलक्ष डॉलर इतकी प्रचंड आहे. त्यांचा मोठा मुलगा एडम ( ६२ ) याने कोर्टात धाव घेतली. आपले वडील इच्छापत्र बनवताना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते असा दावा केला.

आपण वडीलांच्या ४० वर्षे या फार्ममध्ये मेहनत घेतली असल्याने आपल्याला तो मिळावा अशी मागणी केली. परंतू जेनिफरच्या वकीलांना युक्तीवादात सांगितले की रिचर्ड संपूर्णपणे शुद्धीत होते. त्यांनी एडमला संपत्तीतून हटवले होते कारण त्यांचे मुलाशी संबंध बिघडले होते. ज्यावेळी वडीलांना मानसिक रुग्ण ठरवून त्यांना जबरदस्ती रुग्णालयात भरती करण्याचा एडम यांचा प्रयत्न होता. त्यावेळी त्यांचे संबंध बिघडले.

जेनिफर यांच्या वकीलाना सांगितले की एडमला आधीत १० मिलियनहून अधिक संपती आणि जमीन मिळालेली होती. कोर्टाचे जजनी जेनिफरच्या बाजून निकाल देत एडमचा दावा फेटाळून लावला. जजने स्विकार केले की रिचर्ड यांनी एक डिजेनेरिव्ह ब्रेन डिसऑर्डर ( मस्तिक क्षय रोग ) झाला होता. परंतू इच्छापत्रातील बदल त्यांच्या आजाराशी संबंधित नव्हता. ते पूर्वीपासून त्यांच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करत नसत. एडम यांना २००३ मध्ये कळले होते की त्यांचे वडील त्यांना संपत्तीतून बेदखल करणार आहेत. तरीही ते फार्मवर काम करत राहिले. रिचर्ड हे प्रचंड हुशार व्यापारी होते. त्यांनी स्वत:च्या बळावर एवढे मोठे साम्राज्य उभे केले. त्यांनी १९ मुलांना जन्म दिला. सहा मुले पहिल्या पत्नीची होती. तर सहा मुले विवाह बाह्य संबंधातून तर जेनिफर हिच्याकडून सात मुलांना त्यांनी जन्म दिला.

विवाहात मुलगा एडम याचा अडथळा

२०१६ मध्ये रिचर्ड आणि जेनिफर यांचा विवाह होण्यात मुलगा एडम याने अडथळा आणला. आपले वडील मानसिक सक्षम नाहीत असा दावा त्यांनी केला होता. परंतू स्थानिय रजिस्टार आणि वकीलांनी तपासणी नंतर त्यांचा विवाह होऊ शकतो असा निर्वाळा दिला.२०१६ मध्ये रिचर्ड यांनी दोन नवीन स्वतंत्र इच्छापत्र बनवले. ज्यात जेनिफर तिच्या दोन मुले गॉर्डन आणि विल्यम रेडग्रेव्ह स्कॉट यांनी उत्तराधिकारी केले. जेनिफर आता ४३० कोटींच्या संपत्तीची मालकीण बनली आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.