AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजारी देशाने जुनी पंरपरा मोडली; भारताने कडक शब्दात सुनावलं, नेमकं काय घडलं?

भारताचा शेजारी देश बांगलादेशचे पंतप्रदान रहमान हे प्रथम चीन दौऱ्यावर गेले. त्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शेजारी देशाने जुनी पंरपरा मोडली; भारताने कडक शब्दात सुनावलं, नेमकं काय घडलं?
india and bangladeshImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 10:04 AM
Share

शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर आता भारत आणि बांगलादेशमधील संबंधाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ढाकातून घेण्यात येणाऱ्या निर्णयाचा भारत सरकारवर परिणाम होताना दिसत आहे. बांगलादेशमधील आधीचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि आताचे पंतप्रधान तारिक रहमान हेच करत असल्याचे दिसून येत आहे. जुनी पंरपरा मोडून पंतप्रधान रहमान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारताऐवजी प्रथम चीन दौरा केल्याचे समोर आलं आहे.

आता बांगलादेशने नवी दिल्लीत  होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यांना सर्व प्रथम शेख हसीन यांचे प्रत्यार्पण हवे आहे. आता या सर्व प्रकरणावरून भारताने बांगलादेशला चांगलंच सुनावलं आहे. परस्पर संबंधासाठी सामायिक हितसंबंधाचा विचार करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशाला सांगितले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-बांगलादेश संबंधावर पुढे म्हटलं की, दोन्ही देशाचं संबंध तेव्हाच यशस्वी होतील, तेव्हा दोघांचे हित एकमेकांना पूरक ठरतील’. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या आगामी भारत दौऱ्याआधी जयशंकर यांनी केलंलं वक्तव्य महत्वपूर्ण मानलं जात आहे. भारताच्या शेजारी देशांनी स्वत:च्या हितासाठी असे वागणे अपेक्षित नाही. दोन्ही बाजूंच्या हितांसाठी समान भूमिका घेणे  आवश्यक आहे, असं जयशंकर यांनी म्हटलं.

एका कार्यक्रमात एस जयशंकर पुढे म्हणाले, ‘दोन्ही देशाचे संबंध एकमेकांसाठी फायदेशीर असले पाहिजेत. एकमेकांचे हितसंबंध असतील, तर संबंध सुरळीत पुढे जातात, असेही त्यांनी म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाने तारिक रहमान यांना द्विपक्षीय दौऱ्यासाठी आमंत्रित केलं आहे. परंतु या दौऱ्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान संबंधावरही भाष्य केलं. त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधावर भूमिका स्पष्ट केली. दहशतवाद आणि संवाद हा एकत्रपणे नांदू शकत नाही. भारत दहशतवादावरील धोरणावरून तडजोड करू शकत नाही. देशातील जनमताकडे कोणतंही सरकार दुर्लक्ष करणे अशक्य आहे, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटलं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...