AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत जबर अडकला, थेट बांगलादेशाने दिली धमकी, 5 ऑगस्टलाच..

बांगलादेश आणि भारताचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यामध्येच बांगलादेशाने भारताला मोठा इशारा दिला. फक्त इशाराच नाही तर दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल, असेही त्यांनी म्हटले.

भारत जबर अडकला, थेट बांगलादेशाने दिली धमकी, 5 ऑगस्टलाच..
Bangladesh and india
| Updated on: Aug 04, 2026 | 7:21 AM
Share

बांगलादेश आणि भारताचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यामध्येच आता भारताला थेट धमकी बांगलादेशाकडून देण्यात आली. बांगलादेशने भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवावी, अशी मागणी केली. हेच नाही तर भारतात बांगलादेशातून पळून गेलेले लोक अस्थिर संबंध करत असल्याचे त्यांनी म्हटले. याचा परिणाम दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. पहिल्यांदा बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान हसीना यांनी भारतात आल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिकपणे लोकांसमोर येण्याचे जाहीर केले. याच प्रकरणात राज्यमंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी म्हटले की, भारतासोबतचे भविष्य बघून पुढे जात आहोत. आम्हाला त्यांच्यासोबतचे संबंध खराब करायची नाहीत. माझे अगदी स्पष्ट म्हणणे आहे की, भारतालाही आमच्यासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारताला स्पष्ट करावे लागेल की, ते देखील याचे समर्थन करतात की नाही.

यादरम्यान राज्यमंत्र्यांनी म्हटले की, आगामी कार्यक्रम भारतात आयोजित केले जाणार नाहीत. पुढची परिस्थिती पाहून ढाका याबाबत निर्णय घेईल. हे बघून ठरवले जाईल की, दिल्लीला द्विपक्षीय संबंध सुरू ठेवायचे की नाही. जर वाटले की, त्यांनाही गरज आहे तर संबंधित विदेश मंत्रालयासोबत संपर्क साधला जाईल. रिपोर्टनुसार, शमा यांनी म्हटले की, बांगलादेशातून पळून जाणाऱ्या दोषींना भारताने त्यांच्या जमिनीचा वापर करू देऊ नये.

जर भारतात पळालेल्या व्यक्तीमुळे बांगलादेशाच्या स्थिरतेवर काही परिणाम झाले आणि अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा थेट परिणाम दोन्ही देशाच्या संबंधांवर पडेल. असे होऊ शकते पण आम्हाला असे पाहिजे नाही. आम्हाला नक्कीच भारतासोबतचे संबंध सुधारायची आहेत. मला वाटते की, भारतालाही हेच हवे आहे.

बांगलादेशाने 5 ऑगस्ट रोजी हसीना यांचे सार्वजनिक भाषण भारताने रोखले पाहिजे, यावर भर दिला. यासोबतच जर असे झाले नाही तर याचे परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर होईल, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. हसीना 5 ऑगस्ट रोजी संबोधित करणार आहेत. मात्र, हसीना यांना रोखण्यासाठी भारतावर प्रचंड दबाव आहे. बांगलादेश विविध प्रकारे भारताला धमकावत आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...