AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या वडिलांना काही झालं तर अख्ख्या पाकिस्तानला… इम्रान खान यांच्या मुलाची थेट धमकी; पाकमध्ये मोठं काही घडणार?

इम्रान खान यांची बहीण नूरिन नियाझी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कुटुंबिय आक्रमक झाले असून पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

माझ्या वडिलांना काही झालं तर अख्ख्या पाकिस्तानला... इम्रान खान यांच्या मुलाची थेट धमकी; पाकमध्ये मोठं काही घडणार?
Former Prime Minister Imran Khan
| Updated on: Nov 28, 2025 | 12:13 PM
Share

पाकिस्तानमध्ये मोठे वादळ आले असून माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. इम्रान खान यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केला. मागच्या काही आठवड्यांपासून इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. पाकिस्तान सरकार कोर्टाच्या आदेशालाही जुमानत नसल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांच्यावरून पाकिस्तानातील लाहोर आणि रावळपिंडीच्या रस्त्यांवर तणाव वाढत आहे. त्यामध्येच आता इम्रान खान यांच्या मुलाने मोठा दावा करत थेट धमकीच देऊन टाकली आहे. इम्रान खान निरोगी असल्यास त्यांच्या भेटींवर बंदी का घातली जाते असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे. इम्रान खान यांच्या बहिणींना देखील जेल प्रशासनाने त्यांना भेटू दिले नाही. त्यांची मुले देखील त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

इम्रान खान यांची बहीण नूरिन नियाझी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारला मोठी धमकी दिली. कासिम खान याने म्हटले की, पाकिस्तान सरकारने माझ्या वडिलांना पूर्णपणे वेगळे केले आहे आणि कुटुंबाला भेटू दिले जात नाहीये. माझ्या वडिलांना अटक करून आज 845 दिवस झाले आहेत.

मागच्या सहा आठवड्यांपासून त्यांना कोणालाही भेट दिले जात नाही. वकिलांना पण भेटू दिले जात नाही. त्यांच्या बहिणींना देखील भेटू दिले जात नाहीये, कोर्टाच्या आदेशानंतरही. फक्त हेच नाही तर फोनवरून साधे संभाषणही करू दिले जात नाही. त्यांची तब्येत कशी आहे, याचीही साधी माहिती नाही. मी आणि माझा भाऊ कोणत्याही पद्धतीने आमच्या वडिलांसोबत संपर्क करू शकत नाहीत. काहीतरी मोठा कट रचला गेला आहे.

मुळात म्हणजे आमच्या कुटुंबियांना हे देखील माहिती नाही की, ते कसे आहेत काय आहेत. मी आंतरराष्ट्रीय समुदायाला, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना आणि प्रत्येक लोकशाहीवादी आवाजाला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतो. त्यांना राजकीय कारणामुळे जेलमध्ये ठेवण्यात आलंय. इम्रान खानच्या समर्थनार्थ रात्री उशिरापर्यंत शेकडो पीटीआय कार्यकर्त्यांनी आदियाला तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन केले. माझ्या वडिलांना काही झाले तर सरकारला सोडणार नसल्याची थेट धमकी इम्रान खान यांच्या मुलाने दिली. हेच नाही तर पूर्ण पाकिस्तानमध्ये आंदोलने सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.