AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव तारी त्याला… ! 11 महिन्यांच्या चिमुकल्यासह 4 मुलं 16 दिवसांनी जंगलात जिवंत सापडली, विमान दुर्घटनेत झाली होती बेपत्ता

1 मे रोजी विमान अपघात (Amazon Plane Crash) झाल्यानंतर अमेझॉनच्या जंगलात 4 मुले बेपत्ता झाली होती. 16 दिवसांनंतर लष्कराला ही मुले जिवंत सापडली.

देव तारी त्याला... ! 11 महिन्यांच्या चिमुकल्यासह 4 मुलं 16 दिवसांनी जंगलात जिवंत सापडली, विमान दुर्घटनेत झाली होती बेपत्ता
Image Credit source: social media
| Updated on: May 18, 2023 | 12:40 PM
Share

बोगोटा (कोलंबिया) : देव तारी त्याला कोण मारी ! असं म्हटलं जातं. कोलंबियातील विमान अपघातातील (plane crash) चिमुकल्यांसाठी ही म्हण खरी ठरली आहे. कोणत्याही भीषण अपघातात लहान बालकाचे वाचणे चमत्कारापेक्षा कमी नसते. असाच एक चमत्कार कोलंबियामध्ये घडला आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या विमान अपघातानंतर कोलंबियाच्या घनदाट ॲमेझॉनच्या जंगलात (amazon jungle) 11 महिन्यांच्या बाळासह चार मुले जिवंत सापडली आहेत, असे खुद्द राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो (Gustavo Petro) यांनी बुधवारी सांगितले. ‘हा देशासाठी आनंदाचा क्षण आहे’ असे त्यांनी नमूद केले. पेट्रो यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. लष्कराच्या कठीण शोध मोहिमेनंतर ही मुले सुरक्षितपणे सापडली आहेत, असे त्यांनी नमूद केले.

एएफपी न्यूज एजन्सीनुसार, 1 मे रोजी क्रॅश झालेल्या विमानात प्रवास करणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्निफर कुत्र्यांसह 100 हून अधिक सैनिक तैनात केले होते. या विमान अपघाता तीन प्रौढ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्या विमानात 11 महिन्यांचे एक बालक तसेच इतर तीन लहान मुले होती, असे समजते. त्यांचे वय अनुक्रमे 13, 9 आणि 4 वर्षे आहे. विमानाचा अपघात झाल्यापासून ही मुलं त्या लहान बालकासह दक्षिण काक्वेटाच्या जंगलात भटकत होती.

मुलांना जंगलात लाकडी निवारा मिळाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी बचावाचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत. असे बुधवारी सशस्त्र दलाने सांगितले होते. आहेत. यानंतर त्यांना खात्री पटली की मुले अजूनही जिवंत आहेत. सशस्त्र दलांनी जारी केलेल्या फोटोंमध्ये जंगलात एका ठिकाणी कात्री आणि हेअरबँड दिसू शकतात. यापूर्वी एका मुलाची पाण्याची बाटली आणि अर्धवट खाल्लेली फळे सापडली होती.

सोमवार आणि मंगळवारी, सैनिकांना पायलट आणि दोन प्रौढांचे मृतदेह सापडले. हे सर्व जण जंगलातील तळावरून सॅन जोझ डेल ग्वाविअरेकडे उड्डाण करत होते, असे समजते. मृत प्रवाशांपैकी एक महिला ही या मुलांची आई होती. त्या मुलांना शोधल्यानंतर मदतीसाठी तीन हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. त्यातील एक हुआटोटो भाषेत मुलांच्या आजीचा रेकॉर्ड केलेला संदेश वाजवत होता. ज्यामध्ये त्याला जंगलात जाणे बंद करण्यास सांगितले होते.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.