कराची : प्रेम हे आंधळं असतं. त्यात जातपात, गरीब श्रीमंत असा भेद नसतो. प्रेम हे कुणावरही होतं. कोणत्याही वयात होतो. प्रत्येकजण कधी ना कधी तरी प्रेमाच्या झुळूकेने शहारून गेलेला असतोच. मग तो लष्कराचा प्रमुख का असेना… पाकिस्तानच्या लष्कराचे माजी प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ हे सुद्धा एकदा प्रेमात पडले होते. एका बंगाली तरुणीच्या ते प्रेमात पडले होते. मुशर्रफ यांनी त्यांच्या ‘In the line of fire: A memoir’ या आत्मकथनात त्यांची ही लव्ह स्टोरी कथन केली आहे. मुशर्रफ यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रातील अनेक गोष्टींना उजाळा दिला जात आहे.