आम्ही युद्धासाठी तयार… इराणची पुन्हा डरकाळी, अमेरिकेवर गंभीर आरोप; जग संकटात

Iran US Tension : इराणने आपण युद्धासाठी सज्ज असल्याची चेतावणी दिल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे.

आम्ही युद्धासाठी तयार... इराणची पुन्हा डरकाळी, अमेरिकेवर गंभीर आरोप; जग संकटात
Iran vs us Conflict
Image Credit source: Google
| Updated on: May 02, 2026 | 5:55 PM

इराण आणि अमेरिकेतील तणाव अजूनही कायम आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे. कारण इराणच्या सैन्याने इशारा दिला आहे की अमेरिका-इस्त्रायलसोबत युद्ध पुन्हा सुरू होऊ शकते. इराणी लष्कराचे उपअधिकारी मोहम्मद जफर असादी यांनी म्हटलं की, ‘अमेरिका कोणत्याही कराराचे योग्य पालन करत नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांची वक्तव्ये केवळ दिखावा आहेत. अमेरिका माध्यमांद्वारे सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तेलाच्या किमती खाली जाऊ नयेत आणि स्वतःची स्थिती सांभाळता येईल. मात्र आमची सेना पूर्णपणे सज्ज आहे आणि आमच्यावर हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल.’

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला

इराणने युद्धबंदीबाबत चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव पाठवला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा प्रस्ताव नाकारला आहे. इराणच्या सरकारी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘इराण अशा अटी ठेवत आहे ज्या स्वीकारता येणार नाहीत.’ त्यांनी असंही सांगितलं की, ‘इराणचे नेते एकसंध नाहीत आणि वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेले आहेत.’ दुसरीकडे ट्रम्प यांनी हेही म्हटलं आहे की, ‘युद्ध संपलं आहे, कारण दोन्ही देशांमध्ये युद्धविराम लागू आहे.’

वेड्यांच्या हाती अण्वस्त्र देऊ शकत नाही – ट्रम्प

अमेरिकेचा इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध आहे. एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘अमेरिका हे युद्ध लढत आहे कारण, आम्ही वेड्यांच्या हाती अण्वस्त्र देऊ शकत नाही. इराणला अण्वस्त्र मिळण्यापासून रोखणं अत्यावश्यक आहे.’ मात्र दुसरीकडे इराण अण्वस्त्र बनवण्यावर ठाम आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

इराणमध्ये 64 दिवसांपासून इंटरनेट बंद

इराणमध्ये गेल्या 64 दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे देश जवळपास पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नेटवर्कपासून तुटला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला सरकारविरोधी आंदोलनांनंतर ही निर्बंध लावण्यात आले होते आणि फेब्रुवारीच्या शेवटी ते अधिक कडक करण्यात आले होते. इंटरनेट बंदीमुळे देशातील कामकाज आणि व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे.

Follow Us