AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. असे असतानाच आता मोठी आणि हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे. हजारो टन शस्त्रास्त्रे अमेरिकेने थेट इस्रायलला पाठवली आहेत. त्यामुळे भविष्यात काय घडणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन...इराण नकाशावरून संपणार?
donald trumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2026 | 5:39 PM
Share

America And Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यात अजूनही युद्धावर ठोस तोडगा निघालेला नाही. दोन्ही देश आपापल्या भूमिकांवर अडून बसलेले आहेत. इराणने नुकतेच अमेरिकेला एक नवा युद्धसमाप्तीचा प्रस्ताव पाठवला. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता यूस सेंट्रल कमांट CENTCOM चे कमांडर ब्रॅड कपूर आणि जॉईंट चीफ्सच्या अध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाची, सध्याच्या स्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर आता जगाची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या या निर्णामुळे आता आणखी भीषण युद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं? अमेरिकेचा निर्णय काय?

मिळालेल्या माहितीनुसार फक्त 24 तासांच्या आत अमेरिकेने इस्त्रायलला तब्बल 6,500 दारुगोळा तसेच इतर लष्करी उपकरणे दिली आहेत. इराणविरोधात सुरु असलेल्या युद्धादरम्यानच अमेरिकेने हा पाऊल उचलले आहे. या निर्णयाकडे पाहता अमेरिकेच्या मनात काहीतरी वेगळेच चालू आहे, असा अंदाज लावला जात आहे. इराणवर दबाव टाकण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री पाठवल्याचे म्हटले जात आहे.

इस्त्रायलने नेमकी काय माहिती दिली?

इस्रायली संरक्षण विभागाच्या हवाल्याने द इस्रायल टाईम्स आणि द जेरुसलेम पोस्ट या इस्रायली माध्यमांनी अमेरिकेने पाठवलेल्या या शस्त्रास्त्रांसंबधी एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात अमेरिकेचे दोन मालवाहून जहाजे तसेच अनेक विमाने इस्रायलमध्ये आले होते. या विमान आणि जहाजांमध्ये दारुगोळा, सैन्यासाठीचे ट्रक, जॉईंट लाईट टॅक्टिकल व्हेइकल्स तसेच अन्य उपकरण होते.

दरम्यान, आता अमेरिकेने इस्त्रायलला एवढ्या मोठ्या प्रमाणात ही शस्त्रास्त्रे दिल्यामुळे भविष्यात मोठं काहीतरी घडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळेदेखील जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....
राहुरीत अक्षय कर्डिलेंना घवघवीत यश, इतक्या मतांनी विजय
राहुरीत अक्षय कर्डिलेंना घवघवीत यश, इतक्या मतांनी विजय.
5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा?
5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा?.
प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय
प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय.
सुनेत्रा पवार यांचा विक्रमी झेंडा; अजित दादांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला
सुनेत्रा पवार यांचा विक्रमी झेंडा; अजित दादांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला.
पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत भाजपची मुसंडी; दिल्लीत जल्लोषाची लगबग
पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत भाजपची मुसंडी; दिल्लीत जल्लोषाची लगबग.
प. बंगाल निकालावरुन रोहित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले '91 लाख मतदार
प. बंगाल निकालावरुन रोहित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले '91 लाख मतदार.
केरळमच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमधून तीन नावांची चर्चा
केरळमच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमधून तीन नावांची चर्चा.
प. बंगालबाबत अमित शाहांचं जूनं वक्तव्य व्हायरल, '4 तारखेला १ वाजता...
प. बंगालबाबत अमित शाहांचं जूनं वक्तव्य व्हायरल, '4 तारखेला १ वाजता....