4 मुले जन्माला घाला आणि टॅक्समधून मिळवा पूर्ण सूट, टॅरिफच्या वादात मोठी घोषणा, थेट 16563 करोड..
संपूर्ण जगाला अमेरिकेने टॅरिफच्या मुद्द्यावरून ताप दिलाय. हेच नाही तर भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी भारताकडून प्रयत्न केली जात आहेत. त्याध्येच आता टॅरिफच्या वादात एका देशाने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय.

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे संपू्र्ण जग जेरीस आलंय. त्यामध्येच आता सरकाने मोठा निर्णय घेत मोठी घोषणा केलीये. कमी झालेल्या लोकसंख्येमुळे ग्रीस सरकार मागील काही वर्षांपासून चिंतेत आहे. आता लोकसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी थेट मोठी घोषणा केली. लोकसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी थेट 1.6 अरब यूरो म्हणजेच भारतीय रूपयांप्रमाणे 16563 करोड रूपये पॅकेजची घोषणा केली. यामध्ये सरकारने जास्त मुलांना जन्म घालण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी थेट कर (टॅक्स) मध्ये मोठी सूट दिली आहे. ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोताकिस यांनी ही घोषणा केली.
कमी झालेल्या लोकसंख्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय. मुळात म्हणजे देश मोठा आणि लोकसंख्या कमी होताना दिसत आहे. सातत्याने लोकसंख्या कमी होत असल्याने प्रशासन तणावात होते. शेवटी त्यांनी मोठे पॅकेज जाहीर करून लोकांना लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही निर्णय घेतले. फक्त करामध्येच सूट नाही तर त्यांनी अजून काही महत्वाचे निर्णय घेतले.
सरकारने स्पष्ट केले की, जर एखाद्या व्यक्तीला चार मुले आहेत तर त्यांना काहीच कर लागणार नाही. त्यांना करामधून पूर्णपणे सूट मिळणार. यावर बोलताना ग्रीसच्या प्रधानमंत्रींनी म्हटले की, 2026 पासून ज्या घरात चार मुले आहेत, त्या घरात एकही रूपये कर लागणार नाही. कमी होणारी लोकसंख्या लक्षात घेत हे पाऊल उचलले जात आहे. ग्रीसमध्ये प्रजनन दर कमी आहे. यासोबतच प्रधानमंत्री यांनी हा राष्ट्रीय धोका असल्याचे म्हटले.
ग्रीसमध्ये लोकसंख्या 1.02 करोड आहे 2050 मध्ये ही कमी होऊन 80 लाखांपेक्षाही कमी होऊ शकते. भविष्यात हा मोठा धोका असल्याने आता सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. त्यांनी म्हटले की, 15 वर्षांपूर्वी देशात आर्थिक संकट आल्याने प्रजनन दर कमी झाला. मात्र, हा मोठा धोका झालाय. यामुळे लोकांनी अधिक मुलांना जन्म घालावा याकरिता सरकार प्रयत्न करत आहे आणि वेगवेगळ्या योजना देखील आणल्या जात आहेत. भारत आणि चीन वाढत्या लोकसंख्येने चिंतेत असताना दुसरीकडे ग्रीस हा देश कमी झालेल्या लोकसंख्येमुळे.
