AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, लोकांचे वाढले टेन्शन, अमेरिकेत..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतली हे सांगणे कठीण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी मान्य केल्या नाहीत की, ते टॅरिफ लावत आहेत. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफला एखाद्या हत्यारासारखे वापरत आहेत.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, लोकांचे वाढले टेन्शन, अमेरिकेत..
Donald Trump
| Updated on: Sep 09, 2025 | 7:31 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरले आहेत. फक्त जगच नाही तर त्यांच्यावर अमेरिकेतूनही टीका होतंय. डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतील हे सांगणे कठीणच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. त्यांच्या या टॅरिफला जगभरातून विरोध होताना दिसतोय. आता भारतानंतर त्यांच्या निशाण्यावर रशिया आहे. रशियावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प आहेत. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यानेच आपण टॅरिफ लावल्याचे त्यांनी मान्य केले. डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर अनेक प्रकारे दबाव टाकत आहेत. नरेंद्र मोदी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचे फोन उचलणे बंद केले. आता टॅरिफच्या वादात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळालाय.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनबाबतच्या कठोर भूमिकेला पाठिंबा दिला आहे. बहुमताच्या निर्णयात न्यायालयाने लॉस एंजेलिसमध्ये फेडरल एजंट्सना इमिग्रेशन ऑपरेशन्स करण्याचा मार्ग मोकळा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी या निर्णयाशी सार्वजनिकरित्या असहमती दर्शविली आहे. फेडरल न्यायाधीशांच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली.

लॉस एंजेलिसमधील यूएस जिल्हा न्यायाधीश मामे फ्रिमपोंग यांनी 11 जुलै रोजी ट्रम्प प्रशासनाच्या कृतींमुळे अमेरिकन संविधानातील चौथ्या दुरुस्तीअंतर्गत अवास्तव शोध आणि जप्तीपासून संरक्षणाचे उल्लंघन झाले असल्याचे म्हटले होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा विजय मिळाल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसतंय. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर असल्याचेही काही दिवसांपूर्वीच कोर्टाने म्हटले होते. तुम्ही अशाप्रकारे निर्णय घेऊ शकत नसल्याचे थेट कोर्टाने म्हटले होते.

शिवाय तुमचा हा टॅरिफ ऑक्टोबरपर्यंत बंद करा, असेही डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प हे आता रशियावर नेमके काय निर्बंध लादतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण युक्रेनसोबतच्या युद्धामध्ये रशियाने अजूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि उलट युक्रेनवर हल्ले सुरू ठेवली आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत रशियाल इशारा दिला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी