AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात पुन्हा एका अल्पवयीन हिंदू मुलीवर केला गेला अत्याचार, बळजबरीने धर्म परिवर्तन करून लावले गेले लग्न!

Hindu Girl Forcibly Converted in Pakistan : पाकिस्तानात पुन्हा एकदा एका हिंदू मुलीला बळजबरीने धर्म परिवर्तन करवून तिचे लग्न लावण्यात आले.

पाकिस्तानात पुन्हा एका अल्पवयीन हिंदू मुलीवर केला गेला अत्याचार, बळजबरीने धर्म परिवर्तन करून लावले गेले लग्न!
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 11:21 PM
Share

पाकिस्तानात (Pakistan) अल्पसंख्यांक लोकांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहे. विरोध करून सुद्धा या घटना वाढताना दिसत आहे. येथे एका हिंदू समुदायातील(Pakistan Hindu Community) मुलीला बळजबरीने धर्मपरिवर्तन करून तिचे लग्न लावले गेले. या मुलीचे लग्न सिकंदर जारवार नावाच्या व्यक्ती सोबत लावून दिले. ही घटना तोंगो जान मोहम्मद सिंध शहरातील आहे. हे ठिकाण सिंध प्रांत (Sindh Province) मधील आहे. मुलीचा लग्नाच्या जोड्यामध्ये असलेला एक फोटो देखील समोर आलेला आहे. या फोटोमध्ये त्या मुलीने आपल्या हातामध्ये काही कागदपत्र धरली आहेत. त्याचसोबत या लग्नाशी संबंधित असलेले सर्व कागदपत्र देखील आता समोर आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानमधील दक्षिणी सिंध प्रांतमधून अशीच एक घटना समोर आली होती. येथे 18 वर्षाच्या मुलीला अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्या मुलीवर गोळीबार देखील करण्यात आला आणि तिला मारले गेले.

सोमवारच्या दिवशी माध्यमांमध्ये आलेल्या एका माहितीनुसार समाचार पत्र ‘द फ्राइडे टाइम्स’ने आपल्या बातमीमध्ये म्हटले आहे की ,पूजा ओदने सुक्कुरच्या रोही येथील काही अपहरणकर्त्याना विरोध केला त्यानंतर या मुलीवर भर रस्त्यामध्ये गोळी झाडण्यात आली.

वेगाने वाढत आहेत यासारख्या घटना

बातम्यांमध्ये सांगण्यात आले आहे की ,प्रत्येक वर्षी अल्पसंख्यांक समुदायातील संबंधित महिलांना विशेष रूपाने सिंधमध्ये अपहरण केले जाते. या मुलींना धार्मिक वादाचा बळी ठरवले जाते. अनेक मुलींना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले जाते. या समाचार पत्रामध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदाय गेल्या काही काळापासून जबरदस्तीने लग्न आणि धर्मांतर यांचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. येथील अल्पसंख्याक समुदायातील महिलांना काही धार्मिक अतिरेकी बळजबरीने अपहरण करतात आणि जबरदस्तीने धर्म परिवर्तन करून येथील हिंदू मुलीशी लग्न करतात.

सिंधमध्ये सर्वाधिक आढळून आल्यात या घटना..

अशा प्रकारच्या घटना प्रामुख्याने सिद्ध प्रांतांमधून घडलेल्या पाहायला मिळत आहेत.पीपल्स कमिशन फोर मायनॉरिटी राइट्स आणि सेंटर फॉर सोशल जस्टिस यांच्या मते वर्ष 2013 आणि 2019 दरम्यान जबरदस्त धर्मपरिवर्तन केल्याच्या एकंदरीत 156 घटना घडलेल्या आहेत. एका अन्य रिपोर्टनुसार 2019 मध्ये सिंध सरकारने जबरदस्तीने धर्मपरिवर्तन आणि लग् नाला प्रतिबंधक करण्याचे प्रयत्न केले होते परंतु या घटनांशी संबधित असलेल्या बिलाला देखील काही लोकांनी विरोध केला होता.

इतर बातम्या

Explained: इमरान खान यांच्या खुर्चीवर टांगती तलवार, अविश्‍वास प्रस्तावापूर्वीच सेना प्रमुखांनी मागितला राजीनामा, या 3 कारणांमुळे ओढवली परिस्थिती..

पाकिस्तान, चीनवर भारताचा डोळ्यांत तेल घालून पहारा; टेहळणी उपग्रहासाठी 4 हजार कोटी मंजूर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.