AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained: इमरान खान यांच्या खुर्चीवर टांगती तलवार, अविश्‍वास प्रस्तावापूर्वीच सेना प्रमुखांनी मागितला राजीनामा, या 3 कारणांमुळे ओढवली परिस्थिती..

Why Imran Khan Government is on target: पाकिस्‍तानचे पंतप्रधान इमरान खान चार ही बाजूने संकटांमध्ये सापडले आहेत, अशी परिस्थिती त्यांच्यावर का ओढावली? काश्मीरचा मुद्दा उचलून नेमके काय सिद्ध करायचे आहे ?,जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल...

Explained: इमरान खान यांच्या खुर्चीवर टांगती तलवार, अविश्‍वास प्रस्तावापूर्वीच सेना प्रमुखांनी मागितला राजीनामा, या 3 कारणांमुळे ओढवली परिस्थिती..
Imaran KhanImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 8:18 PM
Share

 नवी दिल्लीः पाकिस्‍तान चे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या अडचणीमध्ये अजून वाढ झालेली आहे. मंगळवारी पार पडलेल्या इस्लामी सहयोग संघटन (IOC) बैठकीमध्ये इमरान खान यांनी पुन्हा काश्मीरचा मुद्दा उचलला. इमरान खान यांनी म्हंटले की, काश्मीरमध्ये दिवसा ढवळ्या लुटमार केली जात आहे. या मुद्द्यांवर मुस्लीम देश मौन पाळून बसलेले आहेत. भारत जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) ला मुस्लिमांचे जास्त वरच्या वर्चस्व असलेल्या मुस्लिम अल्पसंख्यांक राज्यामध्ये समावेश करत आहे. इमरान खान यांच्या या विधानाचा दोन वेग वेगळ्या प्रकारे अर्थ काढण्यात येत आहेत. इमरान खान यांनी असे देखील विधान केले की, सरकार धोक्यामध्ये आहे. एका रिपोर्टनुसार, इमरान खान काश्मीर मुद्द्याच्या मदतीने आपल्या पक्षामध्ये पुन्हा सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सेना प्रमुखांची नाराजी आणि विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव कारणामुळे सरकारवर आपत्कालीन परिस्थिती ओढावली आहे.

इमरान खान चारही बाजूने संकटांमध्ये सापडले आहेत. या संकटाचे नेमके कारण काय? काश्मीरचा मुद्दा उचलून नेमके त्यांना काय सिद्ध करायचे आहे ?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे ही तितकेच गरजेचे आहे.

इमरान खान यांच्या खुर्चीवर टांगती तलवार ?

इमरान खान यांचे सरकार हल्ली वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात आहे, याची प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणे आहेत. ही कारणे पुढीलप्रमाणे आहेत..

1- अविश्‍वास प्रस्‍ताव: पाकिस्‍तानात विरोधी पक्षाने आधीच अविश्‍वास प्रस्‍ताव मांडला आहे. 28 मार्चला इमरान खान यांना या प्रस्तावाचा सामना करावा लागणार आहे. इमरान खान यांचे सरकार धोक्यात आहे, कारण की या अविश्वास प्रस्तावासाठी 172 खासदारांचे बहुमत असणे गरजेचे आहे. विरोधी पक्षाकडे 200 खासदार यांचे समर्थन आहे आणि इमरान खान यांच्या सरकारकडे 145 खासदार आहेत. याशिवाय इमरान खान यांच्या पक्षातील अनेक खासदार बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत. 24 खासदारांसोबत बातचीत केल्यानंतर आता इमरान सरकार यांच्याकडे 152 खासदार आहेत. 342 सदस्यांची आकडेवारी असणाऱ्या नॅशनल असेंब्लीमध्ये इमरान खान यांना बहुमतासाठी 172 आकडा जूळवावा लागणार आहे.जर विरोधी पक्ष आपल्या योजनेमध्ये यशस्वी झाले तर इमरान खान यांना आपली खुर्ची सोडावी लागेल.

अविश्वास प्रस्ताव म्हणजे नेमके काय असतं?

पाकिस्तानामध्ये संविधान अनुच्छेद 95 च्या अंतर्गत पंतप्रधान यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणता येतो. हा प्रस्ताव आणल्यानंतर नॅशनल असेंब्लीमध्ये सादर करावा लागतो. हा प्रस्ताव आणण्यासाठी नॅशनल असेंब्लीमध्ये जितकी सदस्य संख्या आहे, त्यातील 20 टक्के सदस्यांना अविश्वास प्रस्तावावर हस्ताक्षर करणे गरजेचे ठरते.प्रस्तावाची लिखित सूचना संसदेतील सचिवालयाकडे जमा करावी लागते. पाकिस्तानामध्ये जर या अविश्वास प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पंतप्रधान इमरान खान यांना त्यांचे पद म्हणजेच खुर्ची सोडावी लागेल.

2- इमरान खान यांचे सेनासोबत असलेले संबंध

देखील बिघडले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये सेना प्रमुख जनरल बाजवा यांनी आयएसआय (ISI) चे चीफ लेफ्ट‍िनेंट जनरल फैज अहमद यांना पदावरून बरखास्त केले होते. इमरान खान यांना घडलेला प्रकार अजिबात आवडला नव्हता. या सगळ्या गोष्टी दरम्यान इमरान खान यांचे सेना सोबत असलेले संबंध हळूहळू बिघडू लागले. मीडिया रिपोर्टनुसार इस्लामी सहयोग संघटनेची बैठक झाल्यानंतर पाकिस्तान सेना प्रमुख बाजवा यांनी इमरान खान यांना राजीनामा देण्यासाठी सांगितले आहे,अशाप्रकारे अविश्वास प्रस्तावाआधीच इमरान खान सरकार यांची खुर्ची संकटात सापडली आहे.

3- आर्थिक संकटामुळे समस्या अधिकच वाढल्या

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. गेल्या 4 वर्षापासून येथील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पेट्रोल पासून ते बटाटे ,टमाटर यांच्या दरा मध्ये विक्रमी वाढ झालेली आहे. इमरान सरकारने यापूर्वीच विदेशी सरकार कडून अब्ज रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. हे कर्ज परत करणे पाकिस्तानला हल्ली शक्य नाही. आतंकवादाच्या मुद्द्याला धरून जगभरामध्ये पाकिस्तान चर्चेचा विषय बनला आहे आणि म्हणूनच अनेक देशांनी आता पाकिस्तानला कर्ज देण्यास विरोध देखील केलेला आहे.

काश्मीरचा मुद्दा कितपर्यंत ठरू शकतो उपयोगी ?

मीडिया रिपोर्टनुसार इमरान खान काश्मीरचा मुद्दा उचलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या उद्भवलेल्या संकटापासून कुठे तरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न देखील करताना दिसत आहेत.एवढे सगळे करून सुद्धा त्यांच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. विरोधी पक्षनेता आणि सेना यांच्या नाराजीमुळे इमरान खान यांच्या खुर्चीवर टांगती तलवार पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

‘त्यासाठी हिम्मत लागते’, वयाच्या पंचविशीत निवृत्ती घेणाऱ्या बार्टीला तापसी पन्नूचा सलाम

SHARE MARKET : शेअर बाजारात घसरण, विक्रीचा वाढता ओघ; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

‘त्यासाठी हिम्मत लागते’, वयाच्या पंचविशीत निवृत्ती घेणाऱ्या बार्टीला तापसी पन्नूचा सलाम

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.