‘त्यासाठी हिम्मत लागते’, वयाच्या पंचविशीत निवृत्ती घेणाऱ्या बार्टीला तापसी पन्नूचा सलाम

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

Updated on: Mar 23, 2022 | 8:02 PM

महिला एकेरीतील नंबर 1 टेनिसपटू अ‍ॅशली बार्टीने (Asleigh Barty) आज निवृत्तीची घोषणा केली. बार्टीच्या निवृत्तीच्या निर्णयाने टेनिस क्षेत्रातील दिग्ग्जांना धक्का बसला आहे.

'त्यासाठी हिम्मत लागते', वयाच्या पंचविशीत निवृत्ती घेणाऱ्या बार्टीला तापसी पन्नूचा सलाम
तापसी पन्नू-अ‍ॅशली बार्टी
Image Credit source: instagram

मुंबई: महिला एकेरीतील नंबर 1 टेनिसपटू अ‍ॅशली बार्टीने (Asleigh Barty) आज निवृत्तीची घोषणा केली. बार्टीच्या निवृत्तीच्या निर्णयाने टेनिस क्षेत्रातील दिग्ग्जांना धक्का बसला आहे. कारण अ‍ॅशली बार्टी अव्वल म्हणजे नंबर 1 स्थानावर असताना तिने निवृत्तीचा निर्णय घेतला. यावर्षाच्या सुरुवातीलाच तिने ऑस्ट्रेलियन ओपनचा (Australian Open) किताब जिंकला होता. अ‍ॅशली बार्टीचं वयही इतकं नाहीय. वयाच्या पंचविशीत तिने टेनिसला रामराम केला. त्यामुळे तिच्या निवृत्तीचा निर्णय जगातील अनेक टेनिसप्रेमींना (Tennis fans) चटका लावून गेला. अ‍ॅशली बार्टी समोर मोठ करीयर असताना तिने हा निर्णय घेतला. ती स्वत: शिखरावर होती आणि ती टेनिसमध्ये पुढच्या काहीवर्षात आणखी शिखरं सर करु शकली असती. तरी तिने हा निर्णय घेणं, अनेकांना चक्रावून सोडणार आहे.

अ‍ॅशली बार्टीचा हा विचार नक्की वाचा

“टेनिसने मला सर्व काही दिलं. माझी सर्व स्वप्न पूर्ण केली. मी सर्वांचे आभार मानते. पण आता दुसऱ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची वेळ आलीय. टेनिस खेळताना अनेक अविश्वसनीय क्षण आले. टेनिसने एक व्यक्ती म्हणून माझ्यात बदल घडवला. अनेक चांगली माणस या प्रवासात भेटली. मी मागच्यावर्षी विम्बलडनपासून निवृत्ती घेण्याचा विचार करत होती. ऑस्ट्रेलियन ओपन हा सेलिब्रेट करण्याचा क्षण होता. आता दुसऱ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची वेळ आलीय. माझा आनंद निकालावर अवंलबून नव्हता. यशासाठी मी सर्व काही केलं. मी आनंदी आहे. टेनिसवर माझा नेहमीच प्रेम राहील”

तापसी पन्नू म्हणाली….

अ‍ॅशली बार्टीच्या निवृत्तीच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूही व्यक्त झाली आहे. तिने टि्वट केलं आहे. तिने बार्टीचा व्हिडिओ शेअर करताना एक संदेश लिहिला आहे. “हा खूप कठीण निर्णय आहे. करीयरमध्ये शिखरावर असताना थांबण्याचा निर्णय घेण्यासाठी हिम्मत लागते” अशा शब्दात तापसीने तिचं कौतुक केलं आहे. मी माझे टेनिस करीयर इथेच संपवतेय, असं बार्टीने जवळचे मित्र आणि पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. बार्टीने आपल्या टेनिस करीयरमध्ये तीन ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI