इस्रायली कमांडोजचा पराक्रम, 3 महिलांना वाचवताना अचानक आले 30 दहशतवादी, वाचा Inside Story

Israel commandos Operation in Gaza : इस्रायली सैन्याने आतापर्यंत अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी बंधक बनवलेल्या नागरिकांची अजूनही सुटका सुरु आहे. इस्रायली सैन्याने असच एक धोकादायक ऑपरेशन केलं. तीन महिलांची सुटका करताना अचानक 30 दहशतवादी समोर आले. त्यावेळी प्लान बी ची कशी अमलबजावणी केली. आमने-सामनेची लढाई लढून सर्व बंधकांची कशी यशस्वी सुटका केली? त्यासाठी वाचा ही स्टोरी.

इस्रायली कमांडोजचा पराक्रम, 3 महिलांना वाचवताना अचानक आले 30 दहशतवादी, वाचा Inside Story
Israel commandos Operation in Gaza
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 6:30 PM

इस्रायली सैन्य खतरनाक ऑपरेशन्स करण्यासाठी ओळखलं जातं. इस्रायली सैन्याने आतापर्यंत अनेक थक्क करुन सोडणारे पराक्रम गाजवले आहेत. IDF ने काही दिवसांपूर्वी हमासच्या कैदेतून चार बंधकांची सुटका केली. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला नोवा म्यूजिकल फेस्टिवलमधून या बंधकांच अपहरण केलं होतं. तेव्हापासून हे सर्व हमासच्या कैदेत होते. त्यांच्या सुटकेसाठी इस्रायली सैन्याला स्पेशल ऑपरेशन करावं लागलं. यात एअर फोर्स, आर्टिलरी कमांड आणि कमांडो मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रमार्गे पॅलेस्टाइनच नियंत्रण असलेल्या प्रदेशात ते घुसले. या ऑपरेशनमध्ये शिन बेट आणि इस्रायली पोलिसांची यमाम ATS युनिट सहभागी झाली होती. ऑपरेशनमध्ये यमामचा एक जवान गंभीररित्या जखमी झाला.

या ऑपरेशनचा प्लान काही आठवड्यापूर्वीच आखण्यात आला होता. विश्वसनीय आणि ठोस गोपनीय माहितीच्या आधारावर योजना बनवण्यात आली होती. बंधकांची सुटका करायचीच, यासाठी IDF कटिबद्ध होती. IDF चे प्रवक्ते रियर एडमिरल डॅनियल हगारी यांनी ही माहिती दिली.

अचानक गाडी बिघडली, मग…

बंधकांच्या सुटकेसाठी शत्रुच लक्ष विचलित करण्याची आणि छळ-कपटाची रणनिती आखण्यात आली. बंधकांना ज्या दोन ठिकाणी ठेवले होते, तिथे सकाळी 11 वाजता पुढे जाण्यासाठी सैन्याला हिरवा कंदिल मिळाला. शिन बेट आणि यमाम युनिटने दहशतवाद्यांशी दोन हात केले. मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असताना बंधकांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. बंधकांना बाहेर काढल्यानंतर तीन जणांना घेऊन जाणार वाहन अचानक खराब झालं. पण आयडीएफच्या मदतीने कमांडोजनी बंधकांना सैन्य हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवलं. बंधकांना लगेच तेल अवीवच्या हद्दी जवळील शेबा मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं.

‘मिस्ता’ अर्विम’ युनिटचा मोठा रोल

सर्व प्रथम स्थानिक नागरिकांमध्ये मिसळणार ‘मिस्ता’ अर्विम’ युनिट नुसेरातच्या स्थानिक बाजारात पाठवण्यात आलं. गोपनीय माहिती गोळा करण्याची जबाबदारी ‘मिस्ता’ अर्विम’ युनिटवर असते. फक्त स्थानिकांकडून माहिती मिळवणं, एवढीच ‘मिस्ता’ अर्विम’ची जबाबदारी नव्हती, तर दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करण ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी होती. त्याशिवाय हवाई टेहळणी आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजीच्या मदतीने माहिती गोळा करण्यात आली. 19 दिवस माहिती गोळा केल्यानंतर हेरांनी बंधकांना कुठे ठेवलय? त्या बद्दल अचूक माहिती मिळवली.

प्लान सादर करण्याचा आदेश

जून महिन्याच्या सुरुवातीला मंत्रिमंडळासमोर ही माहिती ठेवण्यात आली. IDF चे चीफ ऑफ स्टाफ व शिन बेटच्या प्रमुखांना बंधकांच्या सुटकेचा प्लान सादर करण्यास सांगण्यात आलं. गोपनीय माहिती बाहेर फुटणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. वरिष्ठ कमांडर्ससह गाजामधील सुरक्षा पथकांना सुद्धा या बद्दल काही कळू देण्यात आलं नाही.

अंडरकवर सैनिकांनी काय नाटक केलं?

मिळालेल्या माहितीची खातरजमा करणं आणि ऑपरेशनची तयारी करण्यासाठी अंडरकवर सैनिकांची आणखी एक टीम नुसेरात शरणार्थी शिबीरात दाखल झाली. यात हिजाब आणि लांब काळा पोषाख परिधान केलेल्या महिला होत्या. आम्ही गाजाचेच असून एका मोठ्या घराच्या शोधात आहोत, असं नाटक त्यांनी केलं. दोन स्वस्तातल्या कारमधून तिथे पोहोचले. त्यात घराला लागणार सामान गाद्या, कपडे होते.

3 तासात शोधलं घर

नुसेरात शिबिरात राहणाऱ्या अंडरकवर एजंटला विचारलं की, तू कुठून आला आहेस? त्यावर त्याने इस्रायली सैन्याच्या गोळीबारामुळे राफामधून पळाल्याच सांगितलं. त्यांनी एक घर भाड्यावर घेतलं. नोआ अर्गामनीला जिथे ठेवलं होतं, त्या इमारतीकडे इशारा केला. स्थानिकांमधील एकाला जास्त पैशाच आमिष दाखवलं. सध्या जे दर आहेत, त्या पेक्षा दोन ते तीन पट अधिक पैसा मोजण्याची तयारी दाखवली. नोआ अर्गामनीला जिथे ठेवलेलं, त्याच ठिकाणी स्थानिकाच्या मदतीने त्यांनी 3 तासात घर शोधलं.

महिला सैनिकांच्यामागे अंडरकवर पुरुष एजंट

कोणाला आपल्यावर संशय नाही, याची खात्री पटल्यानंतर एजंट्सनी आपलं ऑपरेशन सुरु केलं. दोन टीम्समध्ये विभाजन झालं. एका टीममध्ये दोन कमांडो होते. गाजातल्या सामान्य नागरिकाप्रमाणे एकाने कपडे घातले होते. हिजाबमध्ये फिरणाऱ्या महिलेच्या मागे चार अंडरकवर एजंट्स चालायचे. असच अचानक काही घडलं, तर बॅकअप देण्यासाठी ते शस्त्र सज्ज होते. दुसऱ्या टीममध्ये चार महिला सैनिक होत्या. अरब महिलांसारखा त्यांनी पोषाख परिधान केला होता. त्यातली एक महिला गर्भवती असल्याच नाटक करत होती. तिच्यामागे सतत चार अंडरकवर पुरुष एजंट असायचे. या दरम्यान टीमचे अन्य सदस्य घराची राखण करण्यासाठी तिथे थांबायचे. माहिती गोळा करताना चारही बंधकांना गाजातील दोन कुटुंबात ठेवल्याची पुष्टी झाली.

किती कमांडो पोहोचले?

5 जूनच्या रात्री बहुतांश एजंट त्या भागातून निघून गेले. पुढच्या दिवशी 6 जूनला ‘यमाम’ यूनिटचे 28 कमांडो दोन टीम्समध्ये नुसेरात शरणार्थी शिबीरात पोहोचले. यूनिटमधील सैनिक दोन ट्रकमध्ये लपून प्रवास करत होते. सकाळी बरोबर 11 वाजण्याआधी कमांडोज दोन्ही टार्गेटच्या ठिकाणी पोहोचले. हल्ल्याच्या आदेशाची वाट पाहत होते. त्यानंतर आयडीएफच्या विमानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. बंधक असलेल्या दोन्ही इमारतींजवळ कुठलीही संशयास्पद हालचाल दिसली नाही.

6 मिनिटांच्या आत कमांडोजनी बाहेर काढलं

गल्लीबोळ आणि 800 मीटर लांब रस्त्याच लाइव्ह कवरेज थेट इस्रायलच्या कमांड आणि कंट्रोल सेंटरमध्ये सुरु होतं. ऑपरेशनवर इथूनच लक्ष ठेवलं जात होतं. बरोबर 11 वाजता कमांडोजना पुढे सरकण्याचा आदेश मिळाला. एकाचवेळी त्यांनी दोन्ही इमारतींवर हल्ला केला. इस्रायली कमांडोजनी नोआ अर्गामानी जवळ तैनात दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. 6 मिनिटांच्या आत तिला अपार्टमेंटमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

तिसऱ्या मजल्यावरच्या बंधकांची सुटका कशी करणार?

कमांडो युनिट तिला हेलिकॉप्टर पर्यंत घेऊन गेलं. तिथून तिला लगेच इस्रायलमध्ये नेण्यात आलं. पण दुसऱ्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील अन्य तीन बंधकांना वाचवण खूप कठीण होतं. त्यांना हमास लीडर डॉ. अहमद अल-जमाल यांच्या घरात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा मुलगा अब्दुल्लाह अल-जजीरासाठी लिहितो. तो सुद्धा याच अपार्टमेंटमध्ये राहतो.

अचानक 30 दहशतवाद्यांशी सामना

काही कमांडो पायऱ्यांचा वापर करुन बंधकांना ठेवलेल्या खोलीपर्यंत पोहोचले. पण इमारतीमध्ये असलेल्या 30 दहशतवाद्यांनी ग्रेनेड आणि गोळीबार सुरु केला. त्याने इस्रायली कमांडोंना धक्का बसला. कारण इमारतीमध्ये 30 दहशतवादी असल्याची माहिती अंडरकवर एजंट्सना नव्हती.

भुयारातून अनेक दहशतवादी बाहेर आले

तिन्ही बंधक लढाई सुरु असताना अपार्टमेंटच्या बाथरुममध्ये लपले. आमने-सामनेच्या लढाईत इस्रायली कमांडोजनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. इस्रायली टीम तीन बंधक महिलांना घेऊन बाहेर येताच इमारतीच्या चारही बाजूने भुयारातून अनेक दहशतवादी बाहेर आले. मशीनगन्स आणि आरपीजी मिसाइल्सने आर-पारची लढाई सुरु झाली.

ऑपरेशनचा प्लान बी काय होता?

इस्रायली कमांडो गोळीबार सुरु असताना बंधकांना घेऊन बचाव वाहनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान बचाव वाहनावर दोन आरपीजी मिसाइल्सने हल्ला करण्यात आला. ऑपरेशनच्या कमांडरने ‘प्लान बी’ सक्रिय केला. यात जमीन, हवा आणि समुद्रमार्गे इस्रायली सैनिक बचाव अभियानात मदत करण्यासाठी पोहोचले. रणगाडे घेऊन शेकोड सैनिक शरणार्थी शिबिरात घुसले व हमासच्या दहशतवाद्यांसोबत आमने-सामनेची लढाई सुरु झाली. नौदलाच जहाज पश्चिमेकडून आणि एअर फोर्सच हेलिकॉप्टर पूर्वेकडून कवर देत होतं. इस्रायली सैन्यासमोर या दहशतवाद्यांचा निभाव लागला नाही.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.