जगाचा विनाश नक्की कधी होणार? Harvard University च्या संशोधकाचं महत्त्वाचं भाष्य

ऑक्सिजनची माध्यमं असणारी जंगलं आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत, अशामुळे करोडो जीवजंतू राख होत आहेत. (How Much Time Does Humanity Have Left)

जगाचा विनाश नक्की कधी होणार? Harvard University च्या संशोधकाचं महत्त्वाचं भाष्य
Earth
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 1:56 PM

नवी दिल्ली : मनुष्याच्या जन्मापासून जगाची निर्मिती आणि विनाश याबाबत नेहमी चर्चेचा उहापोह होत असतो. पृथ्वीचा विनाश कधी होणार किंवा जगबुडी कधी येणार हा सातत्याने चघळला जाणारा विषय. हिंदू पौराणिक दंतकथांनुसार जगाची निर्मिती आणि अंत ईश्वराच्या हाती आहे. भगवान विष्णूने स्वत: अवतार घेऊन धरती आणि मनुष्यजातीचा उद्धार केल्याची कथा सांगितली जाते. असाच काहीसा संदर्भ प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये आपआपल्या देवतांशी संलग्न आहे. (How Much Time Does Humanity Have Left Harvard professor avi loeb Answer)

एकीकडे पौराणिक कथा, श्रद्धा-अंधश्रद्धा तर दुसरीकडे सध्याचं विज्ञान युग. दोन्हीमध्ये जगाचा विनाश या विषयाबाबत आपआपल्या पातळीवर, आपआपल्या तथ्यांवर विश्लेषण केलं जात आहे. सिनेमांमधून किंवा प्राचीन ग्रंथांमध्येही धरतीच्या विनाशाबाबत भाष्य केलं जातं.

हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी

जगातील प्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठानेही आता जगाच्या विनाशावर नवा उहापोह घडवला आहे. हॉर्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधक एवी लोएब (Avi Loeb) यांनी एका व्याखानादरम्यान, जगाचं अस्तित्व कधीपर्यंत असेल अशी विचारणा संशोधकांकडे केली आहे. धरतीचा विनाश किंवा मनुष्य प्राण्याचा अंत होण्याची तारीख काय असेल? अशी विचारणा करताना ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) रोखण्यासाठी काम आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महामारी आणि युद्धांची भूमिका

एवी लोएब यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसाने ज्यापद्धतीने पृथ्वीची स्थिती केली आहे, त्यावरुन अंदाज येतो की, माणूस आता जास्त दिवस धरतीवर राहू शकणार नाही. काहीच पिढ्यांमध्ये पृथ्वीवर ही वेळ आली आहे, इतकी वाईट अवस्था झाली आहे की, लोकांना आता अंतराळात जाऊन राहावं लागेल. सर्वाधिक धोका तांत्रिक आपत्तीचा (Technological Catastrophe) आहे.

याशिवाय दोन प्रमुख मुद्दे म्हणजे महामारी आणि युद्धे यामुळेही मनुष्याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. या सर्वांवर योग्यप्रकारे काम केलं नाही तर पृथ्वी मनुष्याचा विनाश करेल किंवा आपलं स्वत:चं अस्तित्व नष्ट करेलं, असं एवी लोएब म्हणाले.

विविध देशात हवामान जे रुप धारण करत आहे, दे चकीत करणारं आहे. हिमकडे वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, ज्वालामुखी पुन्हा उग्ररुप घेत आहे, ऑक्सिजनची माध्यमं असणारी जंगलं आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत, अशामुळे करोडो जीवजंतू राख होत आहेत.

अंतराळात मोठे बेस स्टेशन बनवण्याची तयारी

सर्वांना पौष्टिक अन्न मिळावं यासाठी कायमची उपाययोजना करावी लागेल. अंतराळात मोठे बेस स्टेशन बनवण्याची तयारी करावी. इतकंच नाही तर एलियन्सना संपर्क साधण्याचे प्रयत्न करावे, कारण ज्या दिवशी आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ होऊ, तेव्हापासून पृथ्वीचा विकास सुरु होईल असंही संशोधक एवी लोएब (Avi Loeb) यांनी सांगितलं.

स्पर्म बँक

दरम्यान, जगातील बड्या वैज्ञानिकांनी अंतराळात स्पर्म बँक बनवण्यावर भर दिला आहे. त्याबाबत कामही सुरु झालं आहे. त्यामुळेच असे सर्व शोध हे धरतीच्या विनाशावेळी काही जीव वाचवण्यासाठी उपयोगी ठरतील, असं संशोधक एवी लोएब यांचं म्हणणं आहे.

माणसाची आयुर्मयादा वाढवणे आवश्यक

संशोधक एवी लोएब यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, पृथ्वीच्या विनाशाबाबत विचार मांडले. त्यांनी सांख्यिकी शास्त्रानुसार काही तथ्ये सादर केली. सध्या माणसाची आयुमर्यादा वाढवणे आवश्यक आहे. कारण मला अनेक वेळा विचारलं जातं की आपली तांत्रिक सभ्यता किती वर्ष जिवतं असेल? यावर माझं उत्तर असतं, सध्या आपण आयुष्याच्या मध्यावर आहोत. पृथ्वी लाखो वर्षांपर्यंत राहू शकते किंवा माणसाच्या काही पिढ्या पृथ्वीवर राहू शकतात. मात्र हे भविष्य बदलू शकतं? (How Much Time Does Humanity Have Left Harvard professor avi loeb Answer)

संबंधित बातम्या : 

Video | प्रेशर कुकरमध्ये गोलगोल चपात्या बनवण्याचा देसी जुगाड! व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले अवाक्

सहारनपूरमधून खुणावतोय हिमालयाच्या पर्वतरांगांचा नजारा; मनमोहक फोटो सोशल मीडियात व्हायरल

VIDEO | अथांग समुद्रात उसळी घेणाऱ्या डॉल्फिनसोबत तरुणाचं स्विमिंग; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.