US-China Tariff : भारताला नडतात मग चीनसमोर ट्रम्प का झुकले? टॅरिफचा निर्णय 90 दिवसांसाठी का टाळला? त्यामागे ही 5 मोठी कारणं
US-China Tariff : अमेरिकेने चीनवर एक्स्ट्रा टॅरिफ लावण्याचा निर्णय 90 दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उगाच हा निर्णय पुढे ढकलला नाही. त्यामागे काही कारणं आहेत. अमेरिकेची मोठी मजबुरी आहे. म्हणून त्यांना चीनसमोर झुकावं लागतय. काय कारणं आहेत? ती 5 पॉइंटमध्ये समजून घ्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एक्स्ट्रा टॅरिफ लावण्याचा निर्णय 90 दिवसांसाठी टाळला आहे. अमेरिका-चीन टॅरिफची डेडलाइन 9 नोव्हेंबरपर्यंत वाढल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं. अमेरिकेने सध्या चीनवर 30 टक्के टॅरिफ लावला आहे. एप्रिल महिन्यात अमेरिकेने चिनी सामानावर 245 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर देत आम्ही 125 टक्के टॅरिफ लावू असा इशारा दिलेला. आता अमेरिका चीनवर इतका मेहबान का आहे?
अमेरिका चीनवर उगाच इतका मेहरबान नाहीय. अमेरिका लाख धमकी देईल. पण आकडेच सांगतात, ट्रम्पची अमेरिका चीनवर किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. व्यापारात चीनशी पंगा घेणं अमेरिकेला महाग पडू शकतं. सोबतच अमेरिकन कंपन्यांकडूनही विरोध आहे.
अमेरिकेची मजबूरी
अमेरिकेसाठी चीन किती आवश्यक आहे, ते आयातीच्या आकड्यांवरुन समजून घेऊया. US Import Data च्या आकड्यांनुसार, अमेरिकेत तीन देशातून सर्वात जास्त मागणी आहे. पहिल्या स्थानावर मेक्सिको, दुसऱ्यावर चीन आणि तिसऱ्या स्थानावर कॅनडा आहे. असं नाहीय की, अमेरिका उत्पादनात कुठे मागे आहे, पण चीनला ट्रेड पार्टनर बनवून व्यापार करणं त्यांचा नाईलाज आहे. असं का ते समजून घ्या.
पहिलं कारण
चीनमध्ये मजुरी स्वस्त आहे. लोकसंख्या जास्त आहे. परिणामी कंपन्यांना कमी वेतनात कर्मचारी मिळतात. प्रोडक्टचा उत्पादन खर्च कमी येतो. तीच चीनची सर्वात मोठी ताकद आहे. त्याचा फायदा उचलत चीन जगातील बहुतांश देशांसोबत व्यापार करतो. स्वस्तात सामान विकतो.
दुसरं कारण
चीनकडे मॅन पावर मोठ्या प्रमाणात आहे. चीनमधून अमेरिकेपर्यंत सामान पोहोचवण्याचा शिपिंग टाइम भले जास्त असेल. पण उत्पादन क्षमता आणि बंदरांचं नेटवर्क खास आहे. दोन्ही देशात स्थायी व्यापारी मार्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं स्थापित आहे. ते सुद्धा अमेरिकेच चीनवरील अवलंबित्व वाढण्यामागच एक कारण आहे.
तिसरं कारण
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमनुसार, चीनध्ये अमेरिकी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन ठेवली आहे. आता टॅरिफ वादामुळे चीनमध्ये अमेरिकी कंपन्या अलर्ट झाल्या आहेत. गुंतवणूक कमी करतायत. यूएस-चायना बिजनेस काउंसिल (USCBC) च्या सर्वेक्षणात 2025 मध्ये आढळून आलं की, वर्तमान टॅरिफमुळे 48 टक्के अमेरिकी कंपन्या या वर्षी चीनमध्ये गुंतवणूकीची योजना बनवत आहेत. 2024 मध्ये हेच गुंतवणूक करण्याचं प्रमाणे 80 टक्के होतं.
चौथं कारण
2001 साली WTO मध्ये सहभागी झाल्यानंतर अमेरिकी कंपन्यांसाठी चिनी बाजार खुला झाला. अनेक अमेरिकी कंपन्यांच उत्पादन तिथे शिफ्ट झालं. अमेरिकी कंपन्यांनी कारखाने आणि असेम्बलिंग प्लांट्समध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे चीनवरील अमेरिकेच व्यापारिक अवलंबित्व वाढत गेलं. अमेरिकी कंपन्या आपल्या उत्पादनाचा काही हिस्सा मेक्सिको आणि चीनमधून आऊटसोर्स करतात. चीनमध्ये उत्पादन खर्च आणि कर्मचारी वेतन कमी असल्याने अमेरिकन कंपन्या चीनकडे वळल्या.
पाचवं कारण
चीनमध्ये कारखाने, पार्ट सप्लाई आणि लॉजिस्टिक्स हब सगळे जवळ-जवळ आहेत. अमेरिकेत असं नाहीय. तिथे विखुरलेले आहेत. अमेरिका कमी किंमतीच सामान चीन आणि मेक्सिको या देशातून आयात करतो. अमेरिका कमी खर्चाच सामान मोठ्या प्रमाणात चीन आणि मेक्सिको या दोन देशातून खरेदी करते.
