AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America Tariff : रशियन तेल झालं, टॅरिफच्या लढाईत आता मक्याचा वाद, भारत अमेरिकेकडून मका का विकत घेत नाही?

America Tariff : भारत-अमेरिकेत सुरु असलेल्या टॅरिफच्या लढाईत आता मक्याचा वाद आलाय. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. पण ते आमच्याकडून एक गोणी मका सुद्धा विकत घेत नाहीत, असं अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक म्हणाले. भारत जगातील अन्य देशांकडून मका विकत घेतो. पण अमेरिकेकडून का मका विकत घेत नाही? त्यामागची काय कारणं आहेत, ते समजून घ्या.

America Tariff : रशियन तेल झालं, टॅरिफच्या लढाईत आता मक्याचा वाद, भारत अमेरिकेकडून मका का विकत घेत नाही?
Corn-Donald Trump
| Updated on: Sep 16, 2025 | 11:54 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यामागे वेगवेगळी कारण सांगितली आहेत. यात रशियाकडून तेल खरेदी एक महत्वाचा मुद्दा आहे. आता या लढाईत मक्याचा समावेश झाला आहे. नुकतेच अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी मक्याचा मुद्दा उपस्थित केला. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. पण ते आमच्याकडून एक गोणी मका सुद्धा विकत घेत नाहीत, असं अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक म्हणाले. असं का? भारताने आमच्याकडून मका विकत घेतला नाही, तर त्यांना टॅरिफचा सामना करावा लागेल अशी सरळ सरळ धमकीची भाषा हॉवर्ड लुटनिक यांनी केली. अमेरिकी व्यापार मंत्र्‍यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या मनात हाच प्रश्न निर्माण होतोय की, असं काय कारण आहे की, भारत अमेरिकेकडून मका विकत घेत नाही.

तसं पाहिल्यास भारत नेहमीपासून मक्याचा निर्यातक राहिला आहे. याचा अर्थ भारताकडे स्वत:च्या गरजे इतकं पर्याप्त मका उत्पादन होतं. पण जेव्हापासून इथनॉलच धोरण आलय, मक्याची मागणी वाढली आहे. सरकारने इंधनात इथेनॉल मिसळण्यासाठी मक्याची आयात सुरु केली आहे. भारत आता जगातील अनेक देशांकडून मक्याची आयात करतो. पण, भारताने अजूनपर्यंत अमेरिकेकडून मका खरेदी केलेली नाही. हे सुद्धा ट्रम्प प्रशासनाच्या नाराजीच एक कारण आहे. त्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशाकडून मका विकत घेता, मग आमच्याकडून का नाही?.

भारत मका उत्पादनात कितव्या स्थानी?

उत्पादनाच्या दृष्टीने विचार केल्यास भारत जगातील 6 वा सर्वात मोठा मका उत्पादक देश आहे. इथे खाण्याशिवाय मक्याचा वापर पशू आहार, इथेनॉल उत्पादन आणि पोल्ट्री फॉर्ममध्ये होतो. यूपी, आंध्र प्रदेश, महाराष्‍ट्र, तेलंगण, तामिळनाडू, बिहार, मध्‍य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात मक्याच सर्वात जास्त उत्पादन होतं. देशात सध्या 4 कोटी टन मक्याच उत्‍पादन होतं. 2047 पर्यंत मक्याच उत्पादन वाढवून 8.6 कोटी टन करण्याच लक्ष्य आहे. मक्याच्या वापराचा विचार केल्यास एकूण उत्पादनाच्या 50 ते 60 टक्के पशू आहाराला लागतो. 15 ते 20 टक्के इथनॉल आणि 10 ते 15 टक्के खाण्यासाठी लागतो. काही प्रमाणात मक्याचा वापर उद्योगांमध्ये सुद्धा होतो.

2024 मध्ये भारताने किती लाख टन मका आयात केला?

इथेनॉल बनवण्यासाठी मक्याचा वापर होण्याआधी मक्याची विक्री आणि उत्पादनात एक संतुलन होतं. पण आता जास्त गरज असल्याने मका आयात करावा लागतो. आर्थिक वर्ष 2022-23 पासून इथेनॉल उत्पादनात मक्याचा वापर वाढलाय, पोल्ट्री उद्योगाचा विस्तार आणि साखर उत्पादनातील कमतरतेमुळे मक्याची मागणी वाढत चालली आहे. वर्ष 2023 मध्ये भारताने 5 हजार टन मक्याची आयात केली. वर्ष 2024 मध्ये हाच आकाड वाढून 10 लाख टन झाला.

भारताने कुठल्या देशांकडून मका विकत घेतला?

मक्याची विक्री वाढल्यानंतर आयातीची मागणी वाढली. भारताने दुसऱ्या देशांकडून मका विकत घ्यायला सुरुवात केली. व्यापार मंत्रालयाच्या माहितीनुसार, वर्ष 2024 मध्ये भारताने म्‍यानमारकडून 1 ते 2 लाख टन मका विकत घेतला. 2025 ऑगस्टमध्ये हे प्रमाण 1.3 लाख टन आहे. म्‍यानमारसोबत भारताचा आयात टॅक्‍स फ्री आहे. त्या शिवाय यूक्रेनकडून भारताने जानेवारी ते ऑगस्ट 2025 दरम्यान भारताने जवळपास 4 लाख टन मका विकत घेतला. ही मका खरेदी आयात शुल्‍क मुक्त होती. भारताने एकूण 10 लाख टन मक्याची आयात केली. त्यात थायलंड, अर्जेंटीना सारख्या देशांकडून सुद्धा मका विकत घेतला. भारताला सध्या 60 ते 70 लाख टन मक्याची आवश्यकता आहे.

अमेरिकेत किती मक्याच उत्पादन झालय?

अमेरिका हा मक्याचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक देश आहे. 2024-25 दरम्यान अमेरिकेत 377.63 मेट्रिक टन तृणधान्याच उत्पादन झालं. यात 71.70 मेट्रिक टन तृणधान्याची निर्यात झाली. इंडस्ट्रीयल ग्रेड इथनॉल, पशुधान्य आणि पोल्ट्रीसाठी या मक्याचा वापर झाला.

मका खरेदीसाठी अमेरिका भारतावर का दबाव टाकतेय?

2025-26 मध्ये अमेरिकेत 427.1 मेट्रीक टन मक्याच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हे रेकॉर्ड उत्पादन असेल. त्यातल्या 75 मेट्रीक टनाची निर्यात होईल. पण उर्वरित मक्याच्या निर्यातीसाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून नव्या बाजारपेठेचा शोध घेतलं जाणं स्वाभाविक आहे. इलिनॉय, नेब्रास्का, मिन्नीसोटा, इंडियाना, साऊथ डाकोटा, नॉर्थ डाकोटा, कनसास, ओहायो, विसकॉनसीन अमेरिकेतील या राज्यात मक्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. सहाजिक अमेरिकेला आपल्या शेतकऱ्याच नुकसान करायचं नाहीय. म्हणून ते मका खरेदीसाठी भारतावर दबाव वाढवत आहेत.

चीनने अमेरिकेकडून मका खरेदी का कमी केली?

अलीकडे चीन अमेरिकी मक्याचा सर्वात मोठा खरेदीदार होता. 2022 मध्ये अमेरिकेने $18.57 अब्ज डॉलर मक्याची निर्यात केली. त्यात एकट्या चीनने $5.21 अब्ज डॉलर मक्याची खरेदी केली. यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान अमेरिकेच चीनसोबत व्यापार युद्ध वाढलं. त्यानंतर चीनने अमेरिकेकडून मका खरेदी कमी केली. हा व्यापार फक्त 24 लाख डॉलर मका खरेदीपर्यंत घसरला. त्यामुळ अमेरिकेची नजर भारतीय बाजारपेठेवर गेली. अमेरिकेच्या दृष्टीने भारत मक्यासाठी एक मोठी बाजारपेठ आहे. दूध, अंडी, मासे, मटण याची विक्री वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर जीडीपी सुद्धा वाढतोय. त्यामुळे अमेरिका भारतावर मका खरेदीसाठी दबाव टाकत आहे.

अमेरिकेकडून मका विकत न घेण्यामागची कारणं

जेनेटिकली मोडिफाइड : अमेरिकेकडून मका विकत न घेण्यामागच सर्वात मोठ कारण आहे, जेनेटिकली मोडिफाइड. अमेरिकेत 90 टक्के मका अशा प्रकारचा असतो. भारतात या मक्याचा वापर स्वत:साठी आणि प्राण्यांसाठी करण्यावर कठोर बंदी आहे.

टॅरिफ आणि कॉस्‍ट : अमेरिकेकडून मका विकत न घेण्यामागच दुसरं मोठ कारण आहे, 50 टक्के टॅरिफ. त्याऐवजी भारत यूक्रेन आणि म्‍यानमारकडून टॅरिफ फ्री मका विकत घेतो. अमेरिकेहून मका मागवण्याचा लॉजिस्टिक्‍सचा खर्च जास्त आहे. त्यामुळे भारतात आल्यावर या मक्याची किंमत वाढतो. तो महागडा ठरतो.

मागणी आणि पुरवठ्यात कमी अंतर : भारताला जितक्या मक्याची आवश्यकता आहे, त्याच तितक उत्पादन भारतात होतं. थोडीफार गरज लागते तो मका टॅरिफ फ्री देशातून मागवला जातो. मूळात म्हणजे दुसऱ्या देशातून येणारा हा मका जेनेटिकली मोडिफाइड नसतो.

नीतिगत निर्णय : भारत आपल्या देशांतर्गत शेतकऱ्यांची प्राथमिकता आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करायचं आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी अमेरिकी मक्याच्या खरेदीला परवानगी द्यायची नाहीय.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.