युद्धात युक्रेन संपलं तर युरोप सुध्दा टिकणार नाही; झेलेन्स्की यांच्या नव्या मॅसेजमुळे युरोपात खळबळ

झापोरिझिया अणु प्रकल्पावरील हल्ल्यानंतर झेलेन्स्कीने रशियावर अणु दहशतवादाचा आरोप केला आहे. झेलेन्स्की म्हणतात की, "युक्रेनमध्ये 15 अणुभट्ट्या आहेत, जर अणुस्फोट झाला तर सर्व नष्ट होईल, संपूर्ण युरोप संपेल.

युद्धात युक्रेन संपलं तर युरोप सुध्दा टिकणार नाही; झेलेन्स्की यांच्या नव्या मॅसेजमुळे युरोपात खळबळ
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कीImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:59 AM

रशिया (russia) आणि युक्रेनच्या (ukarine) युद्धाचा (war) आज 10 वा दिवस आहे, रशियाने युक्रेनवरती हल्ला केल्यापासून युक्रेनमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, तर हल्ला केलेल्या परिसरात अनेक मृतदेह पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव मधील सरकारी कार्यालये उद्वस्त केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिथले नागरिक भेटले मार्गाने इतर देशात स्थलांतर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत रशियाने सातत्याने बॉम्ब हल्ले सुरू ठेवल्याने युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे. रशियाच्या मीडियाने झेलेन्स्की हे पोलंडमध्ये पळून गेल्याचा दावा केला होता. परंतु ते कीव मध्येचं असल्याचे युक्रेन म्हणत आहे. नुकतेच झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून युरोप वासियांना एक मॅसेज दिला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, जर युक्रेन वाचलं नाही, तर युरोप सुध्दा वाचू शकणार नाही. त्यामुळं आमच्या समर्थनार्थ उभे राहा, असा मॅसेज त्यांनी दिल्याने युरोपमध्ये खळबळ माजल्याचे वृत्त आहे.

युरोपला का दिला मॅसेज

रशियाकडून सुरूवातीच्या काळात युक्रेनवरती हलक्या पद्धतीचा हल्ला करण्यात आला होता. सध्या रशियाच्याकडून अनेक शहारात जोरात हल्ला सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे, त्यामुळे तिथली लोक अत्यंत भयभीत झाली आहेत. अनेकांनी भेटेल त्या मार्गाने शेजारचा देश गाठला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ही झालं तरी युक्रेन सोडणार नाही अशी भूमिका घेणा-या युक्रेनच्या राष्ट्रपतीनी त्यांचा मुक्काम असून कीव शहरात ठेवला असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले आहे. झेलेन्स्की आपल्या भाषणात युरोपातील लोकांना सांगत आहेत, “गप्प बसू नका, युक्रेनला साथ द्या, कारण युक्रेन टिकले नाही तर संपूर्ण युरोप जगणार नाही. युक्रेन कोसळले तर संपूर्ण युरोप उद्ध्वस्त होईल.”

युक्रेनमध्ये 15 अणुभट्ट्या आहेत, जर अणुस्फोट झाला तर सर्व नष्ट होईल

झापोरिझिया अणु प्रकल्पावरील हल्ल्यानंतर झेलेन्स्कीने रशियावर अणु दहशतवादाचा आरोप केला आहे. झेलेन्स्की म्हणतात की, “युक्रेनमध्ये 15 अणुभट्ट्या आहेत, जर अणुस्फोट झाला तर सर्व नष्ट होईल, संपूर्ण युरोप संपेल. आम्ही तुम्हाला सांगतो की झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर स्टेशन हे पृथ्वीवरील 9 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र आहे. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडून पोलंडमध्ये आश्रय घेतल्याचा दावा रशियाच्या माध्यमांनी केला आहे.

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर, पुण्यातील १६ विद्यार्थी सुखरूप पोहोचले

औरंगाबादेत 23 गावांत होणार खुली व्यायाम शाळा, गंगापूर, खुलताबादेत उभारणार, अंदाजपत्रक लवकरच!

RTE अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ, प्लेग्रुप ते पहिलीसाठी वयोमर्यादा निश्चित

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.