AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US Tension : युद्धात बलाढ्य अमेरिकेचं मनोबल तोडण्यासाठी इराणचही दमदार प्लानिंग, 5 पॉइंटमध्ये समजून घ्या रणनिती

Iran-US Tension : अमेरिकेशी तणावादरम्यान इराणनेही प्रत्युत्तराच्या कारवाईचं पूर्ण प्लानिंग केलय. अमेरिकेचे इरादे हाणून पाडण्यासाठी इराणने सुद्धा तयारी केलीय. इराणचं हे प्लानिंग काय आहे? जाणून घ्या.

Iran-US Tension : युद्धात बलाढ्य अमेरिकेचं मनोबल तोडण्यासाठी इराणचही दमदार प्लानिंग, 5 पॉइंटमध्ये समजून घ्या रणनिती
Iran Supreme Leader Khamenei
| Updated on: Jan 29, 2026 | 3:44 PM
Share

अमेरिकेच्या धमकीनंतर इराणने वॉशिंग्टन विरुद्ध युद्धाची तयारी सुरु केलीय. सुरुवातीलाच अमेरिकेला मोठी जखम देण्याचा इराणचा इरादा आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत गोंधळाची स्थिती निर्माण होईल. तेहरानमध्ये पाच आघाड्यांवर तयारी सुरु आहे. इराण आणि अमेरिकेत सध्या युद्धाचं वातावरण आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार अमेरिकेने इराणवर हल्ल्याची पूर्ण तयारी केली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश येताच अमेरिका तेहरानवर हल्ला करेल.

1 इराणने सर्व गव्हर्नरच्या अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार गव्हर्नर युद्धाच्या स्थितीत आपल्यानुसार पुरवठ्याबद्दल निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे गडबड, गोंधळाची स्थिती येणार नाही. अमेरिकेला दीर्घकाळ युद्धात अडकवून ठेवणं ही इराणची रणनिती आहे.

2 न्यू अरबनुसार इराणने पाण्याखाली मिसाइल्सचा ताफा सज्ज ठेवला आहे. युद्ध सुरु होताच होर्मुज बंद करण्याचा इराणचा प्रयत्न असेल. होर्मुज बंद झाल्यास मध्य पूर्व आणि आशियामध्ये खळबळजनक स्थिती निर्माण होईल. ऊर्जा संकट वाढेल. जून 2025 मध्ये होर्मुज स्ट्रेट डिस्टर्ब करण्यासाठी पाण्याखाली इराणने स्फोटकं पेरली आहेत.

3 इराणने अमेरिकेच्या 40 हजार सैनिकांची हिट लिस्ट तयार केली आहे. अमेरिकेतील वातावरण बिघडवण्यासाठी त्या सैनिकांना मारण्याचा पहिला प्रयत्न असेल. इराणनुसार अफगाणिस्तानात अमेरिकेच्या 7 हजार सैनिकांचा मृत्यू झाला. इथे ही संख्या वाढेल.

4 प्रॉक्सीच्या माध्यमातून मिडिल ईस्टमधील वातावरण बिघडवण्याचाही इराणचा प्रयत्न आहे. येमेनमधल्या हुती बंडखोरांनी लाल सागरात अमेरिकी जहाजांना टार्गेट करण्याचा निर्णय घेतला आहे. लेबनानमध्ये इराणला हिजबुल्लाहच समर्थन मिळेल. इराकच्या कताइबने सुद्धा इराणच समर्थन करणार असल्याचं म्हटलं आहे.

5 इराणने आपले सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेईला लपवलय. सत्ताबदलासाठी खामनेई विरोधात Action आवश्यक आहे. खामेनेईच काम सध्या त्याचा छोटा मुलगा बघतोय. इराणची सत्ता सुप्रीम लीडरच्या आस-पास फिरते.

इराणच्या सुप्रीम लीडरची सत्ता वाचवण्याची जबाबदारी कोणाची?

ग्लोबल फायर पावरनुसार सैन्य ताकदीच्या बाबतीत इराण 16 व्या नंबर वर आहे. इराणच्या सैन्यामध्ये 6 लाख 10 हजार सैनिक आहेत. रिझर्वमध्ये 3 लाखापेक्षा जास्त सैनिक आहेत. 1.50 लाख रिवोल्यूशनरी गार्ड मध्ये आहेत. इराणच्या सुप्रीम लीडरची सत्ता वाचवण ही IRGC ची जबाबदारी आहे.

सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.