अमेरिकेत गोऱ्या मुलाने भारतीय विद्यार्थ्याचा गळा दाबला, 4 मिनिटे तडफडत होता मुलगा, शाळेने तीन दिवसांसाठी त्यालाच केले सस्पेंड, गळा दाबणाऱ्याला मात्र..

अमेरिकेत गोऱ्या मुलाने भारतीय विद्यार्थ्याचा गळा दाबला, 4 मिनिटे तडफडत होता मुलगा, शाळेने तीन दिवसांसाठी त्यालाच केले सस्पेंड, गळा दाबणाऱ्याला मात्र..
Indian student beaten by American student
Image Credit source: social media

या सगळ्या घटनेनंतर शाळेने केलेली कारवाई ही वर्णद्वेष दाखवणारी असल्याची टीका होते आहे. या घटनेनंतर भारतीय मुलाला तीन दिवसाची तर अपराध करणाऱ्या गोऱ्या मुलाला एकाच दिवसाची शिक्षा करण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे.

संदिप साखरे

|

May 18, 2022 | 9:20 PM

टेक्सासभारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student )अमेरिकेत कोणत्या त्रासांना सोमोरे जावे लागते, त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. टेक्सास राज्यातील एका शाळेत भारतीय विद्यार्थ्याचा गळा एक गोरा मुलगा (White boy)दाबत असल्याचा हा व्हिडीओ आहे. या प्रकरणात शाळेने केलेल्या कारवाईवरुनही आता संताप व्यक्त करण्यात येतोय. कारण शाळेने ज्या मुलाचा गळा दाबला गेला, त्या भारतीय मुलाचा तीन दिवस सस्पेंड केले (suspension)आहे, तर ज्या मुलाने हा गळा दाबण्याचा प्रय्तन केला त्या गोरा मुलाचे मात्र एकाच दिवसाकरीता निलबन करण्यात आले आहे.

काय आहे व्हिडीओत

व्हिडीओत स्पष्टपणे दिसते आहे की गोरा मुलगा, भारतीय विद्यार्थ्याचा जोराने गळा आवळतो आहे. सुमारे चार मिनिटे त्या गोऱ्या मुलाने भारतीय विद्यार्थ्याचा गळा आवळून ठेवला आहे. हा भारतीय मुलगा किती तडफडतोय, हेही या व्हिडीओत पाहायला मिळते. ११ मे रोजी डलासच्या कोपेल मिडिल स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. या मुलांची भांडणे सुरु असताना वर्गातील एका दुसऱ्या मुलाने हा व्हिडीओ शूट केला आहे.

मनगटाने दाबला गळा

हा गोरा मुलगा बेंचवर बसलेल्या अमेरिकनभारतीय मुलाकडे जातो. त्याला उभा राहा असे सांगतो. मात्र भारतीय मुलगा उठण्यास नकार देतो, तेव्हा अमेरिकन मुलगा त्याच्या गळ्याच्या मागून दाब देण्यास सुरुवात करतो, त्यानंतर मुलाच्या मानेभोवती मनगटाने तो त्याचा गळा दाबत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. गळा दाबतानाच तो त्याच्या बेंचला धक्काही मारतो. त्यानंतर भारतीय मुलगा जमिनीवर पडतो. त्यानंतरही गोरा मुलगा त्याच्या खांद्यावर दाब देतो, असेही व्हिडीओत दिसते आहे.

हे सुद्धा वाचा

गोऱ्या मुलाला कमी शिक्षा झाल्याने नाराजी

या सगळ्या घटनेनंतर शाळेने केलेली कारवाई ही वर्णद्वेष दाखवणारी असल्याची टीका होते आहे. या घटनेनंतर भारतीय मुलाला तीन दिवसाची तर अपराध करणाऱ्या गोऱ्या मुलाला एकाच दिवसाची शिक्षा करण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें