Nimisha Priya : निमिषा प्रियाच्या माफीसाठी मिळणारे 8.5 कोटी रुपये घ्यायला पीडित कुटुंब का तयार नाही?
Nimisha Priya : येमेनच्या तुरुंगात बंद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी भारत सरकार आणि धार्मिक नेते प्रयत्न करत आहेत. निमिषाच कुटुंब ब्लड मनीपोटी 8.5 कोटी रुपयांची रक्कम द्यायला तयार आहे. पण मृतकाचं कुटुंब इतकी प्रचंड रक्कम का स्वीकारत नाहीय? त्यांचं म्हणणं काय आहे.

येमेनच्या तुरुंगात बंद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी दिल्लीपासून सनापर्यंत प्रयत्न सुरु आहेत. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांपासून ते मुस्लिम धर्मगुरु या प्रकरणात सक्रीय झाले आहेत. पण ब्लड मनीच्या मुद्यावर एकमत होत नाहीय. ब्लड मनीच एक आशा आहे, ज्याद्वारे निमिषाचे प्राण वाचू शकतात. येमेनच्या कायद्यानुसार मृतकाचं कुटुंब आरोपीकडून मिळणारी ब्लड मनीची रक्कम स्वीकारून त्याला माफ करु शकतं. निमिषा हिला वाचवण्यासाठी मृतकाच्या कुटुंबाला 8.5 कोटी रुपये रक्कम मिळू शकते. निमिषा प्रियावर बिझनेस पार्टनर अब्दो महदीच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणात निमिषा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येमेनमधील शरिया कायद्यानुसार महदी कुटुंबाने ब्लड मनीची रक्कम स्वीकारली तर निमिषाची सुटका होऊ शकते.
निमिषाच्या कुटुंबाने ब्लड मनीपोटी 8.5 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. पैसे सुद्धा गोळा केलेत. पण अब्दो परिवार अजूनपर्यंत ही ब्लड मनीची रक्कम स्वीकारायला तयार नाहीय. प्रश्न हा आहे की, अब्दो परिवार ब्लड मनीसाठी का राजी होत नाहीय?. अब्दो परिवाराला ही रक्कम कमी वाटतेय का? त्यांच्यावर अन्य कुठला दबाव आहे का?
माफी मिळण्यात नेमकी अडचण काय आहे?
निमिषा प्रिया केसमध्ये हुती बंडखोर सक्रीय झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी 14 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत अटॉर्नी जनरलनी याचे संकेत दिले. अटॉर्नी म्हणाले की, हूती बंडखोरांनी या घटनेला सन्मानाशी जोडलं आहे.
येमेनच्या धर्मगुरुंसोबत बंद दाराआड चर्चा
अब्दो महदी परिवार आणि हूती बंडखोर ब्लड मनीबद्दल बोलत नाहीयत. म्हणून हा विषय पुढे सरकत नाहीय. सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. कुटुंब तिथे आहे. चर्चा सुरु आहेत. हुती बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सुन्नी समुदायाच्या ग्रँड मुफ्तींना केरळमध्ये डेरा टाकला आहे. ग्रँड मुफ्ती अबूबकर मुसलियार यांनी येमेनच्या धर्मगुरुंसोबत बंद दाराआड चर्चा केली.
हूतीची दहशत
हूती येमेनमध्ये एक्टिव आहेत. येमेनच्या राजधानीत भारताचा कुठला दूतावास नाहीय. त्यामुळेच निमिषा प्रियाला वाचवताना भारताला अडचणी येत आहेत. हूती बंडखोरांनी मागच्या 6 वर्षांपासून येमेन आणि आसपासच्या भागात दहशत निर्माण केली आहे. सौदीच्या रियादमधून भारतीय दूतावास हे सर्व प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. हूतीचे सौदीसोबत चांगले संबंध नाहीयत. सौदीची भूमिका नेहमीच अमेरिकेला अनुकूल असते.
