AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Ship Attacked : हे सहन करणार नाही, गुजरातच्या जहाजावरील मिसाइल हल्ल्यानंतर भारताचा स्पष्ट शब्दात इशारा

Indian Ship Attacked : हॉर्मुज स्ट्रेटमधून ओमानच्या किनाऱ्यावरुन जाणारं गुजरातचं मालवाहतूक जहाजं बुडालं. 'हाजी अली' नावाचं हे जहाज 13 मे च्या सकाळी ओमानच्या समुद्री क्षेत्रातून जात होतं.

Indian Ship Attacked : हे सहन करणार नाही, गुजरातच्या जहाजावरील मिसाइल हल्ल्यानंतर भारताचा स्पष्ट शब्दात इशारा
strait of hormuz
| Updated on: May 14, 2026 | 4:30 PM
Share

ओमानच्या किनाऱ्यावर भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने कठोर शब्दात निषेध केला आहे. असे हल्ले अजिबात सहन केले जाणार नाहीत हे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. बुधवारी ओमानाच्या किनार्‍यावर भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर झालेला हल्ला कुठल्याही परिस्थिती मान्य नाही असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. व्यावसायिक जहाजं आणि सर्वसामान्य नाविकांना वारंवार लक्ष्य केलं जातय याचा आम्ही निषेध करतो, असं भारताने म्हटलं आहे. भारतीय चालक दल पूर्णपणे सुरक्षित असल्याची परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टि केली आहे. भारताने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. जहाजावरील भारतीय क्रू सुरक्षित असून त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो असं परराष्ट्र मंत्रालयाने लिहिलं आहे. व्यावसायिक जहाजांना टार्गेट करणं आणि निष्पार क्रू सदस्यांचा जीव धोक्यात टाकणं अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत असं भारताने म्हटलं आहे.

हॉर्मुज स्ट्रेटमधून ओमानच्या किनाऱ्यावरुन जाणारं गुजरातचं मालवाहतूक जहाजं बुडालं. ‘हाजी अली’ नावाचं हे जहाज 13 मे च्या सकाळी ओमानच्या समुद्री क्षेत्रातून जात होतं. त्यावेळी त्यावर ड्रोन किंवा मिसाइलने हल्ला झाला. या नंतर जहाजामध्ये आग भडकली. ओमानच्या कोस्टगार्डने सर्वच्या सर्व 14 क्रू मेंबर्सचे प्राण वाचवले. काही रिपोर्ट्सनुसार, 13 मे च्या सकाळी एमएसवी हाजी अली जहाज बुडालं. गुजरातच्या द्वारकामध्ये राहणारे सुलतान अहमद अंसार यांच्या मालकीचं हे जहाज होतं. बेरबेरा बंदरातून हे जहाज शारजाह येथे चाललं होतं.

3.30 च्या सुमारास या जहाजावर हल्ला झाला

पहाटे 3.30 च्या सुमारास या जहाजावर हल्ला झाला. जहाजावर स्फोटकासारखं काहीतरी येऊन आदळलं असं चालक दलाच्या सदस्याने सांगितलं. त्यानंतर जहाजाने पेट घेतला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून जहाजावरील 14 क्रू मेंबर्सनी लाइफ जॅकेट घातलं व जहाज सोडलं. यावेळी ओमानी कोस्ट गार्डने भारतीय खलाशांची मदत केली. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून जलवाहतूक जवळपास ठप्पच आहे. अमेरिका आणि इराण दोघांनी नाकेबंदी करुन ठेवली आहे. काही जहाजं धोका पत्करुन इथून प्रवास करतायत. काहीवेळा जहाजांवर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?