AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसाधी भारताला मिळाली मोठी गुड न्यूज, थेट परदेशातून आली बातमी

जागतिक आर्थिक मंदी आणि भू-राजकीय तणावाच्या काळात भारत निर्यातीचा नवा इतिहास घडवत आहे. ही केवळ आपली वैयक्तिक गोष्ट नाही, तर सरकारची आकडेवारी आहे.

स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसाधी भारताला मिळाली मोठी गुड न्यूज, थेट परदेशातून आली बातमी
| Updated on: Aug 14, 2026 | 9:13 AM
Share

आता स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसआधी भारतासाठी मोठी बातमी आली आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि भू-राजकीय तणावाच्या काळात भारत निर्यातीचा नवा इतिहास घडवत आहे. ही केवळ आपली वैयक्तिक गोष्ट नाही, तर सरकारची आकडेवारी आहे. सरकारच्या निर्यातीच्या आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, भारताची चीन आणि अमेरिकेला होणारी निर्यात सातत्याने वाढत आहे. एकीकडे, भारताचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या अमेरिकेला होणारी निर्यात 12.85 टक्क्यांच्या दमदार गतीने वाढली आहे.

दुसरीकडे, चीनला होणाऱ्या भारतीय मालाच्या निर्यातीत 64.75 टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. चीनसोबत सुरू असलेला सीमावाद आणि ‘मेक इन इंडिया’ला मिळणारा जोर या पार्श्वभूमीवर, चिनी बाजारपेठेत भारतीय मालाच्या मागणीत अचानक वाढ होऊ लागली आहे, वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या अहवालानुसार, जुलै महिन्यात भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 12.85 टक्क्यांनी वाढून 9.o2 अब्ज डॉलर झाली, तर चीनला होणारी निर्यात 64.75 टक्क्यांनी वाढून 2.2 अब्ज डॉलर झाली. या महिन्यात या देशांकडून होणाऱ्या आयातीतही लक्षणीय वाढ दिसून आली.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चीनकडून होणारी आयात 34.42 टक्क्यांनी वाढून 14.67 अब्ज डॉलर झाली, तर अमेरिकेकडून होणारी आयात 18.11 टक्क्यांनी वाढून 5.5 अब्ज डॉलर झाली. एप्रिल-जुलै 2026-27 दरम्यान, भारताची अमेरिकेला होणारी वस्तूंची निर्यात 3 टक्क्यांनी वाढून 34.5 अब्ज डॉलर झाली, तर आयात 22.42 टक्क्यांनी वाढून 22.12 अब्ज डॉलर झाली. त्याचप्रमाणे, चीनला होणारी निर्यात 35.79 टक्क्यांनी वाढून 7.78 अब्ज डॉलर झाली, तर आयात 29.38 टक्क्यांनी वाढून 52.71 अब्ज डॉलर झाली. भारत आणि अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत. अमेरिकेने 24 जुलैपासून भारतावर 10 टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात सिंगापूरला होणारी निर्यात वार्षिक तुलनेत 83.7 टक्क्यांनी वाढून 1.6 अब्ज डॉलर झाली. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत निर्यात 97.11 टक्क्यांनी वाढून 8.1 अब्ज डॉलर झाली. याच काळात UAE, नेदरलँड्स, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, श्रीलंका, इटली आणि व्हिएतनामला होणाऱ्या निर्यातीतही सकारात्मक वाढ नोंदवली.  तर जुलैमध्ये युके, बांगलादेश, सौदी अरेबिया आणि नेपाळला होणारी निर्यात घटलेली पाहायला मिळाली.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...