भारताने अमेरिकेच्या भूमीवरच सुनावले खडेबोल, जयशंकर यांनी थेट म्हटले, हे नाटक..
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यातच आता अमेरिका भारतावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. भारतानेही अमेरिकेने टॅरिफ लावण्यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात राहिली आहेत. त्यातच अमेरिकेच्या संसदेत रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याबाबतचा विधेयक मंजूर करण्यात आला. भारतावर 100 टक्के टॅरिफचे मोठे संकट आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंधावर याचा थेट परिणाम होणार. त्यातच आता न्यूयॉर्कमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, एकेकाळी अमेरिकेत असा दृष्टिकोन होता की भारताकडे फारसे पर्याय नसावेत. पण आता याउलट बघायला गेले तर अमेरिकेने स्वत: मात्र नेहमीच आपले खुले पर्याय ठेवले आहेत. पण तुम्ही आमच्यासोबत असलेल्या संबंधांवरच लक्ष केंद्रित करावे, अशी आमची इच्छा आहे. तो दिखावा देखील संपला आहे.
मुळात म्हणजे सर्वजण एकमेकांसोबत मोकळेपणाने काम करत आहेत. अशा प्रकारे आपण बहुध्रुवीय जगाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. जे योग्य आहे. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटी आयोजित कार्यक्रमात हे मोठे विधान केले. विशेष बाब म्हणजे याच कार्यक्रमात पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रकरणांसाठी अमेरिकेचे माजी सहाय्यक परराष्ट्र मंत्री डॅनियल रसेल उपस्थित होते.
विविध देश एकमेकांशी संवाद साधत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बहुध्रुवीय जगाच्या दिशेने होत असलेल्या व्यापक बदलाचाच हा एक भाग आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय भागीदारींचे जाळे एकाच वेळी हाताळण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. थेट अमेरिकेतूनच अमेरिकेच्या धोरणांबद्दल बोलताना एस. जयशंकर हे दिसले आहेत. अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर त्यांनी थेट आपले मत मांडले.
चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग अमेरिकेच्या दाैऱ्यावर होते. यादरम्यान चीन आणि अमेरिकेत मोठे करार झाले. चीन आणि भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. मात्र, चीनवर अमेरिका टॅरिफ लावण्याची शक्यता कमी आहे. भारतावर 100 टक्के टॅरिफ अमेरिका लावू शकते. तश्या हालचाली सुरू आहेत. भारताने अगोदरच स्पष्ट केले की, आम्ही आमच्या जनतेसाठी योग्य असणारी निर्णय घेणार आहोत.
