AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा दबदबा, पाकिस्तानची अवस्था वाईट, कोण कितव्या स्थानावर?

Most Powerful Country List : ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित लोवी इन्स्टिट्यूटने वार्षिक आशिया पॉवर इंडेक्स 2025 अहवाल जारी केला आहे. यात 27 आशियाई देशांच्या लष्करी, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक ताकदीचा उल्लेख करण्यात आला आहे.

सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा दबदबा, पाकिस्तानची अवस्था वाईट, कोण कितव्या स्थानावर?
India PowerImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 4:31 PM
Share

जागतिक स्तरावर भारताची ताकद वाढत आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित लोवी इन्स्टिट्यूटने वार्षिक आशिया पॉवर इंडेक्स 2025 अहवाल जारी केला आहे. यात 27 आशियाई देशांच्या लष्करी, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक ताकदीचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार चीन आशियातील प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच भारताची ताकदही आशियात वाढत असल्याचे यातून समोर आले आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेचा आशियातील प्रभाव काहीसा कमी होताना पहायला मिळत आहे.

लोवी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या अहवाताय आठ क्षेत्रांवर फोकस करत देशांची क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यात लष्करी क्षमता, संरक्षण नेटवर्क, आर्थिक ताकद, राजनैतिक प्रभाव, सांस्कृतिक पोहोच, लवचिकता आणि भविष्यातील संसाधन क्षमता या क्षेत्रांचा समावेश आहे. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तानची अवस्था वाईट आहे. पाकिस्तान 16 व्या क्रमांकावर आहे.

सर्वात शक्तिशाली देश

  1. अमेरिका – 80.5 सुपर पॉवर
  2. चीन – 73.7 सुपर पॉवर
  3. भारत – 40.0 प्रमुख शक्ती
  4. जपान – 38.8 मध्यम शक्ती
  5. रशिया – 32.1 मध्यम शक्ती
  6. ऑस्ट्रेलिया 31.8 मध्यम शक्ती
  7. दक्षिण कोरिया 31.5 मध्यम शक्ती
  8. सिंगापूर 26.8 मध्यम शक्ती
  9. इंडोनेशिया 22.5 मध्यम शक्ती
  10. मलेशिया 20.6 मध्यम शक्ती

भारताची ताकद वाढत आहे

लोवी इन्स्टिट्यूटच्या या अहवालात आशियातील भारताच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारत 2025 मध्ये 40.0 गुणांसह प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारताच्या ताकदीतील वाढ त्याच्या मजबूत आर्थिक विकासामुळे आणि वाढलेल्या लष्करी क्षमतांमुळे झाली आहे. मात्र भारताचा राजनैतिक आणि आर्थिक प्रभाव अजूनही कमी आहे.

अमेरिकेचा प्रभाव घटला

या अहवालात महासत्ता म्हणून अमेरिका आणि चीन यांना स्थान देण्यात आले आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र 2018 मध्ये आशिया पॉवर इंडेक्स सुरू झाल्यापासून त्यांना सर्वात कमी गुण मिळालेले आहेत. ट्रम्प सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांचा फटका अमेरिकेला बसलेला आहे. जपान या यादीत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे रशियाचीही ताकद वाढताना दिसत आहे. रशिया या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या देशांचाही टॉप 10 देशांमध्ये समावेश आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.