भारत ताठ मानेने उभा! डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला आणि धमक्यांना भारताचे थेट उत्तर, सप्टेंबर महिन्याची खळबळ उडवणारी आकडेवारी पुढे…
डोनाल्ड ट्रम्प हे सुरूवातीला भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता धमक्या देताना दिसले. फक्त धमक्याच नाही तर त्यांनी थेट भारतावर मोठा टॅरिफ लावला. मात्र, त्यादरम्यान भारताने शांततेची भूमिका घेतली. आता भारताने थेट उत्तर अमेरिकेसा दिले आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात होते. त्याचाच एक भाग म्हणज डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. टॅरिफ लावूनही भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. मग काय डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी थटथयाट सुरू केला. भारताबद्दल वादग्रस्त विधाने केली. मात्र, भारत त्यांच्यापुढे अजिबातच झुकला नाही. उलट भारताने रशियाकडून तेल खरेदी अधिक वाढवली. ऑगस्टपेक्षा सप्टेंबर महिन्यात हा आकडा अधिक वाढला.
चीनच्या भूमीवर नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात भेट देखील झाली. काहीही झाले तरीही आम्ही दोन्ही देश एक आहोत, असा संदेश जगाला रशिया आणि भारताने दिला. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून अमेरिकेसोबत संबंध चांगले आहेत. मात्र, कोणीही भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी रोखू शकले नाही. नुकताच आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत भारताने अधिक तेल सप्टेंबर महिन्यात रशियाकडून खरेदी केलंय. यामुळे हे स्पष्ट होते की, अमेरिकेच्या दबावाचा भारतावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही.
रिपोर्टनुसार, 1 ते 16 सप्टेंबरच्यामध्ये भारताने 17.3 लाख बॅरल प्रत्येक दिवसी रशियाचे तेल आयात केले. या तुलनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 15.9 आणि 16.6 लाख बॅरल प्रत्येक दिवसी होते. सप्टेंबर महिन्यातील बुकिंग वाढताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून थेट धमकी दिली होती. मात्र, याच भारतावर काहीच परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. हेच नाही तर अमेरिकेच्या दबावानंतर तेल रिफायनरी कंपन्यांना सरकारने नवीन कोणतेही निर्देश दिली नव्हती.
भारत हा जगातील सर्वात मोठा तिसरा असा देश आहे की, तो रशियाकडून 88 टक्के कच्चे तेल आयात करतो. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा जगातील पहिल्या क्रमांकावरील देश आहे. मात्र, अमेरिकेकडून भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने टॅरिफ लावण्यात आला. मात्र, चीनवर अजूनही कोणत्याही प्रकारचा टॅरिफ हा अमेरिकेने लावला नाहीये.
