टॅरिफ वॉरदरम्यान भारत नवी रणनिती अवलंबणार, ट्रम्पसोबत होणार वार्तालाप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतिनंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. असं असताना दोन्ही देशातील वार्तालाप थंड बस्त्यात गेला आहे. त्यामुळे संवाद पुर्नस्थापित करण्यासाठी भारताने एक नवी रणनिती अवलंबली आहे. काय आणि कसं ते समजून घ्या..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठी भूमिका घेत अनेक देशांना टॅरिफच्या जाळ्यात गुंतवलं आहे. भारतावरही 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. त्यात दोन्ही देशांत कमालीचा व्यापार तणाव वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याची संवाद साधण्याचा एक पर्याय निवडला आहे. यासाठी नवीन लॉबिंग फर्मची नियुक्ती केली आहे. भारतीय दूतावासाने राजनैतिक संपर्क मजबूत करण्यासाठी माजी सिनेटर डेव्हिड विटर यांच्या नेतृत्वाखालील फर्म मर्क्युरी पब्लिक अफेयर्ससोबत करार केला आहे. हा करार तात्पुरता आहे. हा करार ऑगस्टच्या मध्यापासून नोव्हेंबर 2025 पर्यंत असेल. भारत या लॉबिंग फर्मीसाठी दर महिन्याला 75 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 65.5 लाख रुपये खर्च करेल. नोव्हेंबरपर्यंत जवळपास 1.97 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या फर्मकडे अमेरिकन सरकारशी निगडीत कामं आणि अन्य सल्ला देण्याचं काम सोपवलं आहे.
भारताच्या हितसंबंधासाठी अमेरिकेत काम करणारी मर्क्युरी ही एकमेव फर्म नाही. यापूर्वीही भारती एसएचडब्ल्यू पार्टनर्स एलएलसीसोबत करार केला आहे. भारत या फर्मला वर्षाकाठी 15.7 कोटी रुपये देत. या फर्मचे प्रमुख जेसन मिलर आहे. त्यांनी यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे. मर्क्युरीसोबत करार करण्याच प्रमुख कारण म्हणजे सूजी वाइल्स.. त्याने यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जवळची सहयोगी आहे. यापूर्वी या कंपनीच्या वॉशिंग्टन आणि फ्लोरिडा शाखेचं काम पाहात होती. आता ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याने ही फर्म इतर काही देशांसाठी काम करत आहे. डेन्मार्क, इक्वाडोर, आर्मेनिया आणि दक्षिण कोरियासाठी काम करत आहे.
दरम्यान, भारत अशी रणनिती अवलंबणारा एकमेव देश नाही. पाकिस्तान देखील लॉबिंग वर कोट्यवधि रुपये खर्च करत आहे. महिन्याला जवळपास 5.24 ककोटी खर्च करत आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजूक आहे. असं असताना पाकिस्तान सहा लॉबिंग आणि पब्लिक रिलेशन्स फर्मांवर काम करत आहे. पाकिस्तानच्या या रणनितीचा परिणाम दिसून आला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत बैठकीची संधी मिळाली होती. इतकंच काय तर अमेरिकेने भारताच्या तुलनेत पाकिस्तानवर कमी टॅरिफ लादला आहे. भारतावर 50 टक्के तर पाकिस्तानवर 19 टक्के टॅरिफ आहे.
