AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांच्या विजयामुळे भारत खूश पण चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचं टेन्शन वाढलं

डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा सत्तेत येणार आहेत. ट्रम्प यांचा जानेवारीमध्ये शपथविधी होऊ शकतो. ट्रम्प हे पुन्हा सत्तेत येणार असल्याने आतापासूनच जगात वेगवेगळे बदल घडायला लागले आहेत. ट्रम्प यांच्या भूमिकांमुळे अनेक देशांना फटका बसू शकतो तर अनेकांचा आशा देखील आहेत.

ट्रम्प यांच्या विजयामुळे भारत खूश पण चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचं टेन्शन वाढलं
| Updated on: Nov 08, 2024 | 7:34 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारीत अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जागतिक व्यवस्थेत काही बदल दिसण्याची शक्यता आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण हे इतर अमेरिकन अध्यक्षांपेक्षा वेगळे आहे. निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांनी विजयानंतर वेगवेगळ्या देशाच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि इतर जागतिक नेत्याचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प आशिया खंडातील देशांसोबत संबंध दृढ करण्यावर महत्त्व देतात. परिस्थितीत त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आणखी अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. भारताच्या शेजारी देशांबाबत ट्रम्प यांचे धोरण काय असू शकते हे देखील भारतासाठी महत्त्वाचे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले होते. ट्रम्प आणि पीएम मोदी यांच्यातही मैत्रीपूर्ण संबंध दिसून आले. ट्रम्प यांनी भारताचे एक अद्भुत देश आणि मोदी यांचे एक अद्भुत व्यक्ती असे वर्णन केले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सर्वात मजबूत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आता ट्रम्प पुन्हा एकदा अध्यक्ष होणार असल्याने नव्या कार्यकाळातही ते भारताला त्यांचे प्राधान्य देतील. विशेषत: चीनला रोखण्यासाठी ट्रम्प भारताला सहकार्य करु शकतात. ते क्वाड पुन्हा सक्रिय करु शकतात. ज्यामुळे त्याला एक नवीन गती मिळू शकते आणि यामुळे अमेरिका आणि भारत जवळ येण्याची शक्यता आहे.

चीन

डोनाल्ड ट्रम्प हे चीनला सर्वात मोठा धोका मानतात. चीनच्या विरोधात ते नेहमीच आवाज उठवत असतात. आपल्या रॅलीमध्ये देखील त्यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर ६० टक्के आयात शुल्क लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारयुद्ध मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प पहिल्या टर्ममध्ये चीनविरोधात उचललेल्या पावलांवर दुप्पट भर देऊ शकतात. दुसरीकडे, ट्रम्प चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्यावहारिक, व्यवहारिक सौद्यांसाठी खुले असण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान

ट्रम्प यांचे पाकिस्तानबाबतचे धोरण इतर राष्ट्राध्यक्षांपेक्षा वेगळे राहिले आहे, त्यांनी अनेकदा पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली होती. पाकिस्तानवर दहशतवादाला आश्रय दिल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे २०१८ मध्ये अमेरिकेने दिलेली लष्करी मदतही थांबवली होती. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला होता. बायडेन यांच्या कार्यकाळात परिस्थिती बदलली आणि त्यांनी पुन्हा पाकिस्तानला लष्करी मदत सुरू केली. पण आता ट्रम्प यांच्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा खीळ बसू शकते. पाकिस्तान दुटप्पी  असल्याचा आरोप ते करतात.

बांगलादेश

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बांगलादेशसाठी देखील अत्यंत महत्त्वाची होती, कारण अंतरिम सरकारचे विद्यमान प्रमुख मोहम्मद युनूस हे डेमोक्रॅट्सच्या जवळचे मानले जातात. त्यांना बायडेन यांचा  पाठिंबा होता. पण आता ट्रम्प यांच्या विजयामुळे बांगलादेशच्या सरकारला फटका बसू शकतो. युनूस यांनी याआधी ट्रम्प यांच्यावर उघडपणे टीका केली होती. ट्रम्प यांनी देखील एका भाषणात युनूस यांच्यावर निशाणा साधला होता. आता ट्रम्प सत्तेत आल्याने बांगलादेशच्या राजकारणात बदल घडू शकतात.

अफगाणिस्तान

ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तालिबान पुन्हा तेथे सत्तेवर आले होते. आता ट्रम्प यांच्या विजयामुळे तालिबानला देखील आशा आहे. पण ते सावधही आहे, कारण ट्रम्प त्यांचा निर्णय कधी बदलू शकतो हे सांगता येत नाही. अपारंपरिक नेत्यांशी बोलण्यासाठी ट्रम्प हे नेहमीच तयार असतात. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांची भेट घेऊनही त्यांनी असाच संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.