भारत संकटात, हाफिज सईदचा हादरवणारा प्लॅन, थेट बांगलादेशातून… लवकरच मोठा हल्ला?
Hafiz Saeed: पाकिस्तानी दहशतवादी बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला सैफ याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताविरोधात दहशतवादी कारवाया केल्या आहे. यात भारताचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाकिस्तानी दहशतवादी बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला सैफ याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याने हाफिज सईद निष्क्रिय बसलेला नाही, तो आगामी काळात भारतावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बांगलादेशमार्गे भारतावर हल्ल्याची तयारी
समोर आलेल्या माहितीनुसार हाफिज सईद भारताविरुद्ध कुरापती करण्याच्या तयारीत आहे. लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना बांगलादेशमध्ये देखील सक्रिय आहे. आता हाफिज सईद आता बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. यासाठी सईदने आपल्या एका सहकाऱ्याला बांगलादेशात पाठवले. हा सहकारी जिहादच्या नावाखाली स्थानिक तरुणांना भडकावत असून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देत असल्याची माहिती समोर आली आहे.
सैफुल्लाहचा व्हिडिओ आला समोर
पाकिस्तानातील खैरपूर तामिवली येथे 30 ऑक्टोबर रोजी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बोलताना सैफुल्लाह म्हणाला की, ‘हाफिज सईद रिकामा बसलेला नाही; तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे. आपले लोक पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) सक्रिय आहेत आणि भारताला प्रत्युत्तर देण्यास तयार आहेत.’ टीव्ही9 ला मिळालेल्या व्हिडिओमध्ये या रॅलीला लहान मुले देखील उपस्थित होती. त्यामुळे या मुलांचे ब्रेनवॉश सुरु असल्याचे समोर आले आहे.
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख
लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला सैफ याने या रॅलीत भारत-पाकिस्तान तणाव आणि ऑपरेशन सिंदुरचाही उल्लेख केला. सैफ म्हणाला की, “9-10 मे रोजी रात्री भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. आता, अमेरिका आमच्यासोबत आहे आणि बांगलादेश देखील पुन्हा पाकिस्तानच्या जवळ येत आहे.” यातून हे स्पष्ट होते की पाकिस्तान आगामी काळात भारताविरोधात आणखी दहशतवाद्या कारवाया करण्याची शक्यता आहे.
हाफिज सईदवर अमेरिकेचे बक्षीस
अमेरिकेने हाफिज सईदवर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. 2019 मध्ये हाफिजला पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवले होते, मात्र काही काळानंतर त्याला सोडून देण्यात आले. हाफिज सईद सध्या पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. आता तो आगामी काळात भारताविरोधात दहशतवादी कट आखत आहे.
