AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराच्या ध्वजारोहण समारंभावर भाष्य करणे पाकिस्तानला पडले महागात, भारताने थेट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक लोक सहभागी होते. या समारंभाकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. या समारंभाबद्दल पाकिस्तान सरकारकडून बेताल विधान करण्यात आले.

राम मंदिराच्या ध्वजारोहण समारंभावर भाष्य करणे पाकिस्तानला पडले महागात, भारताने थेट...
Ram temple Ayodhya
| Updated on: Nov 27, 2025 | 9:44 AM
Share

उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये राम मंदिराचा ध्वजारोहण समारंभ पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याचे हे प्रतिक आहे. या समारंभाला देशातील अनेक नामवंत लोक उपस्थित होते. अयोध्येत कडक सुरक्षा यादरम्यान बघायला मिळाली. पीएम नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाषणे यादरम्यान झाली. मात्र, राम मंदिराच्या ध्वजारोहण कार्यक्रम पाहून पाकिस्तानाची मोठी पोटदुखी उठली. पाकिस्तानने बेताल टिप्पणी केली आहे. या टिप्पणीला आता भारताकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणल्याचे बघायला मिळाले. त्यामध्येच दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा बॉम्बस्फोट झाला.

पाकिस्तानच्या टीकेवर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांन म्हटले की, धर्मांधता, दडपशाही आणि अल्पसंख्याकांवर पद्धतशीर अत्याचाराचा खोलवर कलंकित इतिहास असलेल्या पाकिस्तानला इतरांना उपदेश करण्याचा कोणताही नैतिक आधार नक्कीच नाहीये. पुढे त्यांनी म्हटले की, पाकने ढोंगी उपदेश देण्याऐवजी स्वतःच्या खराब मानवी हक्कांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. दुसऱ्यांना उपदेश देण्याचा त्यांच्याकडे अधिकारच नाही.

भारताने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान मुस्लिम देशांना भारताच्या विरोधात उभा करत आहे. तुर्कीला हाताला धरून मोठा कट रचत आहे. अफगाणिस्तानवर नुकताच मोठा हल्ला पाकिस्तानने केला. पाकिस्तानी सैन्याने चक्क लहान लेकऱ्यांना टार्गेट करत हल्ला केला. ज्या हल्ल्यात अनेक अफगाणिस्तान लेकऱ्यांचा जीव गेला. ज्यानंतर देशात मोठी खळबळ आली.

त्यामध्येच अफगाणिस्तानचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारताच्या दाैऱ्यावर होते. या भेटीदरम्यान त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि वाणिज्य राज्यमंत्री यांच्याशी व्यापक बैठका घेतल्या. जयस्वाल म्हणाले की, अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातही भाग घेतला. अफगाणिस्तान आणि भारताच्या जवळीकतेमुळेही पाकिस्तानचा जळफळाट उठला आहे. राम मंदिराच्या ध्वजारोहणाबद्दल बोलणाऱ्या पाकची बोलती आता बंद करण्यात आली.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.