हलके पण अचूक ! ब्रिटन भारताला देणार केवळ 13 किलोचे सुपर क्षेपणास्र, दोन्ही देशात डिफेन्स डील
भारत आणि ब्रिटनमधील संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्यात अचानक हालचाली वाढल्या आहेत. या भागीदारीत अशी पावले उचलली जात आहेत,ज्याने प्रादेशिक सुरक्षा आणि धोरणात्मक संतुलन बदलू शकते. या करारात कोणती शस्त्रे आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे ते पाहूयात

ब्रिटन आणि भारतादरम्यान संरक्षण आणि शस्रास्र खरेदीचे नाते आता अधिक मजबूत होताना दिसत आहे. ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान भारत आणि ब्रिटन यांनी 350 मिलियन पाऊंड म्हणजेच 468 मिलियन डॉलरचे खरेदी करार केले आहेत. या अंतर्गत भारतीय सैन्याला आता ब्रिटन निर्मित हलकी क्षेपणास्रे सिस्टीमचा (Lightweight Multirole Missiles) पुरवठा केला जाणार आहे. या कराराला ब्रिटन आणि भारत यांच्यात एका व्यापक डिफेन्स डीलच्या दिशेचे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. या संदर्भात दोन्ही सरकारमधील बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.
मिसाईलची खासियत काय ?
LMM मिसाईलला एडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम मानले जात आहे. ही केवळ 13 किलोग्रामची हलकी मिसाईल आहे. जिची ऑपरेशनल रेंज 6 किलोमीटर हून जास्त आहे. गती Mach 1.5 हून जास्त आहे. ही मिसाईल हवा, जमीन आणि नौदलाच्या ऑपरेशन्ससाठी अनुकूल आहे. प्रिसिजन लेझर बिम रायडिंग गायडेन्स सिस्टीमने सुसज्ज आहे. ज्यामुळे टार्गेटवर अचूक वार करता येतो. आणि आजूबाजूचे नुकसान कमी होते.
ब्रिटीश सरकारने दिलेल्या माहितीनुसार थेल्स कंपनीची ही मिसाईल उत्तर आयर्लंड येथे तयार केली जाते. यामुळे सुमारे ७०० जणांची नोकरी सुरक्षित होईल, ही मिसाईल सध्या युक्रेनला देखील पुरवली जात आहे.
ब्रिटनची रणनीती आणि आर्थिक दृष्टीकोन
गेल्या 12 महिन्यात स्टार्मर यांनी ब्रिटनच्या डिफेन्स सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यांनी NATO टार्गेटच्या मते खर्च वाढवण्याची घोषणा केली आहे. आणि विदेशी निर्यात वाढवण्यावर फोकस केला आहे. अलिकडेच नॉर्वेशी त्यांनी 13.5 बिलियन डॉलरचा फ्रिगेट सामंजस्य करार केला आहे. तो याच रणनितीचा भाग आहे.
ब्रिटन आणि भारताने नौदलाच्या नौकासाठी इलेक्ट्रीक पॉवर इंजिनाच्या खरेदीचा पुढचा करार देखील सुरु केला आङे. याचे प्रारंभिक मुल्य 250 मिलियन पाऊंड निश्चित केले आहे.याने दोन्ही देशाचे तंत्रज्ञान आणि रणनिती सहकार्य आणखी मजबूत होणार आहे.
.
